महालोकवाणी न्यूज:
फुंडे-दिनांक-१५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयात वीर वाजेकर पुण्यतिथी व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी व विचारवंत प्राध्यापक अशोक बागवे उपस्थित होते. त्यांच्या समवेत कवी नारायण लाळे, सतीश सोलापूरकर त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. बाळाराम पाटील( माजी शिक्षक आमदार, रायगड विभाग सल्लागार समिती, रयत शिक्षण संस्था सातारा) प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते मा. श्री .रामशेठ ठाकूर( सदस्य मॅनेजिंग कौन्सिल, रयत शिक्षण संस्था सातारा)मा.श्री.कृष्णा कडू, मा. श्री. सुधीर सेठ घरत, मा. श्री. कॉम्रेड भूषण पाटील,मा. भावणताई घाणेकर,मा.श्री.मेघनाथ तांडेल, मा.श्री.उमेश म्हात्रे,शैलजा सुधीर घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्राचार्य,डॉ.प्रल्हाद पवार यांनी आपल्या प्रस्ताविकातून,वीर वाजेकर यांचे जीवनचरित्र व कार्याविषयी उल्लेख केला,महाविद्यालयाची वाटचाल,व प्रगती याविषयी सविस्तर मांडणी केली. आज रायगड मध्ये भूमीपुत्रांची जी चळवळ उभी राहिली आहे,तिचं बीज वाजेकरांच्या योगदानात आहे.

कार्यक्रमाच्या कार्याध्यक्षा डॉ.झेलम झेंडे यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा अहवाल वाचन केले.मा.श्री.भूषण पाटील ,कामगार नेते यांनी वाजेकरांच्या योगदानाचा उल्लेख करून,आज आपल्या देशाला राज्यघटना वाचविणे ही काळाची गरज आहे.झुंज क्रांतिवीरांची,आणि गाथा बलिदानाची या पुस्तकांविषयीचे महत्त्व विशद केले.
मा.श्री.सुधीरशेठ घरत यांनी या प्रदेशात राहणाऱ्या आगरी,कोळी,कऱ्हाडी समाजाला ज्या व्यक्तीने एकत्र बांधून त्यांचे हक्क व अधिकार मिळवून दिले,आणि सावकारी पाशातून मुक्त केले ते म्हणजे ८४ गावचे लोकमान्य लोकराजे वाजेकर यांच्या कार्याचा सतत स्मरण व्हायला हवे,असे मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी अशोक बागवे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेची आजची स्थिती गती आणि वास्तव्यावर मिशकल भाष्य केले.विनोदी भाषेशैलीतून विद्यार्थ्यांना खळखळून हसविले,तसेच विचार करायला सुद्धा भाग पाडले.कला शाखेतील विद्यार्थी हा माणूस वाचायला शिकतो.विद्यार्थ्यांनी घोकमपट्टी न करता सर्जनशील व्हावे,नवनिर्मिती करावी असा संदेश दिला.कवी सतीश सोलनपुरकर यांनी आपल्या कवितेतून आईच्या भाकरीने घडलेल्या माणसांची गोष्ट सांगितली,कवी नारायण लाळे यांनी सावलीच झाडं, असा उल्लेख वीर वाजेकरांचा केला.

महाविद्यालयातील विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या प्राध्यापकांचे विशेष सत्कार करण्यात आले.महाविद्यालयातील गुणवंत,क्रीडा,सांस्कृतिक,राष्ट्रीय सेवा योजना,राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना बक्षीसे देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमास तु. ह.वाजेकर विद्यालयातील सर्व सेवक व वीर वाजेकर
कॉलेजचे सर्व सेवक व सुमारे ५०० विद्यार्थी उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुजाता पाटील व डॉ.श्रेया राहुल पाटील यांनी केले.विद्यार्थी प्रतिनिधी कु.जमकू चदाने,सचिव मयूर पाटील उपस्थित होते,कार्यालयीन प्रमुख श्री.बाळकृष्ण दगडे,श्री.अविनाश पाटील या सर्वांचे सहकार्य लाभले.प्राचार्य,सौ.सुनीता वर्तक यांनी आभार मानले.
