पुणे जिल्हा प्रतिनिधी बबनराव धायतोंडे
महालोकवाणी न्यूज:- दि 1 फेब्रुवारी 2023
शारदा सदन प्राथमिक शाळा बोरीपारधी केडगाव .येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते सुरवातीला दिप प्रज्वलन माजी विद्यार्थी कल्पना पटेल व मोहन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्याचे प्रमुख आयोजक . भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे दौंड तालुका उपाध्यक्ष . हेमंतराव नेवसे व .सौ निकिता शहा सौ मयुरी चोपडा सौ कल्पना पटेल यांनी केले होते.या मेळाव्याला एकूण 30 ते 35 विद्यार्थी उपस्थित होते .
Budget 2023| Aadhaar-PAN Card बाबत मोठा निर्णय..
या मेळाव्याला सौं मंदान मॅडम.सौ अर्चना उंडे मॅडम. सौ अरुणिमा पाटील मॅडम.सौ आचल आगामकर मॅडम. ईयादी शिक्षक उपस्थित होते. व त्या ठिकाणी हेमंत नेवसे व निकीता शहा मनोगत व्यक्त करताना म्हणले की आम्हाला आज आपण माजी विद्यार्थी सर्व जन 27 वर्षानंतर ऐकत्र भेटल्या मुळे अतिशय आनंद झाला आहे व आपण सर्वानी सतत संपर्कात राहून जिवनाचा असाच आनंद द्विगुणित करत राहु व आपल्या वर्ग मित्र .परिवाराच्या सुखदुःखात सहभागी राहु.तसेच या मेळाव्यामध्ये सर्वांनीच व्यसनमुक्ती पासून दुर राहण्याचा निश्चय केला व हिच गुरु दक्षिणा म्हणून हेमंत नेवसे .निकिता शहा यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांना शब्द दिला..आलेल्या सर्व शिक्षकांचा पुष्प वृष्टी अंथरूण भव्य स्वागत केले. या मेळाव्याला योगेश सातपुते ..हर्षल दिवार..सागर सावंत..विकास पवार..शुभांगी निकम..रत्नमाला शर्मा.श्रद्धा जठार. इत्यादी सर्व माजी विद्यार्थी. विद्यार्थीनी उपस्थित होते सुत्रसंचलन प्रदिप सोडनवर जयसिंग टुले यांनी केले व सर्वांचे आभार गौरव सोडनवर यांनी मानले.
