जामखेड प्रतिनिधी – धनराज पवार
संत निरंकारी मंडळ शाखा जामखेड अंतर्गत जवळा शाखेच्या वतीने आज दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. संत निरंकारी मिशन व भारत सरकार यांचे संस्कृती मंत्रालय यांच्या सहकार्यातून स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्ताने सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांचे आदेशानुसार पाणी पुरवठा विहीर मुंजेवाडी तलाव जवळा या ठिकाणी अमृत प्रोजेक्ट अंतर्गत “स्वच्छ जल स्वच्छ मन ” या उपक्रमाचा शुभारंभ जवळा ग्रामपंचायत चे सरपंच प्रशांत शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच प्रशांत शिंदे म्हणाले , संत निरंकारी मिशन हे “पुण्याचे काम व सेवा करण्याचे काम करीत आहे. आज रोजी भारत सरकार यांचे संस्कृती मंत्रालय यांच्या सहकार्यातून स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवा निमित्ताने” स्वच्छ जल, स्वच्छ मन या उपक्रमांतर्गत जवळा येथील विहीर तसेच मुंजेवाडी तलाव परिसर स्वच्छता केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट मानवत हितासाठी केलेली सेवा अनमोल आहे.

अमित गंभीर म्हणाले, बाबा हरदेव जी महाराज यांनी समाज कल्याणासाठी अनेक सामाजिक कार्य हाती घेतले आहेत. यामध्ये स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर आणि असे अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांच्या शिकवणीची प्रेरणा घेऊन संत निरंकारी मिशनच्या वतीने विद्यमान सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली जवळा येथे आज रोजी “स्वच्छ जल स्वच्छ मन” या उपक्रमाची सुरवात झाली. यावेळी दत्तात्रय कोल्हे म्हणाले ,या उपक्रमाचा मुख्य उद्देश ‘जल संरक्षण’ हा होता प्रामुख्याने पाण्याचे स्रोत शुद्धीकरण आणि स्वच्छ करणे व जनजागृती करणे.

याप्रसंगी संत निरंकारी मिशन जामखेड चे मुखी अमित गंभीर,जवळा येथील प्रबंधक दत्तात्रय कोल्हे, धिरज भोसले , दिपक मोरे , डॉ. हजारे , शिवाजी हजारे ,विश्वनाथ नाळे ( सर) , भुजंग पवार , शरद अनभुले, सदाशिव रोडे आदी तसेच सेवा दलातील सर्व महात्मे व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जामखेड येथून आलेले महात्मे तसेच जवळा येथील ग्रामस्थ यांनी स्वच्छता केल्याबद्दल जवळा शाखेचे प्रबंधक दत्तात्रय कोल्हे यांनी आभार मानले.
