Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » संत भगवानबाबा यांचा ८९वा अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची झाली सांगता.धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,भगवान गड यांच्यातील दुरावा संपला.!

संत भगवानबाबा यांचा ८९वा अखंड हरिनाम नारळी सप्ताहाची झाली सांगता.धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,भगवान गड यांच्यातील दुरावा संपला.!

mahalokwaniBy mahalokwaniApril 11, 2023Updated:April 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

सोमराज बडे,पाथर्डी प्रतिनिधी: –

अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी ता.पाथर्डी येथे गुरुवर्य संत भगवानबाबा यांनी सुरु केलेला नारळी सप्ताह निमित्ताने दि.०४ एप्रिल ते दि.११ एप्रिल या कालावधीत आयोजित ८९ वा.नारळी अखंड हरिनाम सप्ताह सुरु होता.


दररोज सकाळी काकडा,भजन,गाथा भजन, रामकथा, दररोज रात्री कीर्तन,जागर असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज (ता.११)रोजी भगवान गडाचे महंत हभप.नामदेव शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १ वाजता संत भगवानबाबा यांच्या चरण पादुकावर पुस्पवृष्टी करत सप्तहाची सांगता करण्यात आली.

सप्ताहाच्या कार्यक्रमात अनेक साधू संत,राजकीय नेते यांनी भेट दिली. सांगता प्रसंगी माजी मंत्री पंकजा मुंडे,माजी मंत्री धनंजय मुंडे,शेवंगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


शास्त्रीनी जरी शिव्या घातल्या तरी माझ्यासाठी त्या फुले असतील असे नामदेव शाश्री यांना उद्देशून पंकजा मुंडे बोलतांना म्हणाल्या.तर धनंजय मुंडे हे म्हणाले की ताई म्हणाली होती की मी भगवान गडाची पायरी आहे. जर ती पायरी असेल तर मी त्या पायरीचा दगड आहे.
आमच्यात दुरावा हा राजकारणात असला तरी आम्ही नात्याने एक आहोत .आज काही वेळ का होईना ताई माझ्याजवळ आहे.याचे मला समाधान आहे,
असेही धनंजय मुंडे म्हणाले. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे तसेच महंत नामदेव शास्त्री हे आज एकाच व्यसपीठावर एकत्र आल्याने भाविक समाधान व्यक्त करताना दिसत होते.


दरम्यान या सप्तहाची सांगता प्रसंगी राज्यभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
लाखोंचा भाविक समाज यावेळी उपस्थित होता. अन्नदान ,पाणी,पार्किंग व्यवस्था,आरोग्य सेवा आदींची व्यवस्था ग्रामस्थांनी चोख ठेवली होती.
भारजवाडी ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या भाविक भक्तांचे स्वागत करण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड येथील शासकीय निवासी शाळेत “क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले” यांची जयंती साजरी.!
Next Article Jamkhed Breaking| जामखेड पिपल्स एज्युकेशन सोसायटीत आर्थिक घोटाळा; बरखास्त संचालक मंडळावर गुन्हे दाखल होणार.!
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.