अहमदनगर ; संदेशनगर( वसंत टेकडी ) येथील साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उद्या पासून सलग तीन दिवस साई उत्सवाचे आयोजन, करण्यात आले आहे. दिनांक १ जुलै ते ३ जुलै २०२३ च्या दरम्यान साई उत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे, प्रभाग दोन मधील कर्तव्यदक्ष नगरसेवक तशा स्थायी समिती सदस्य अहमदनगर महानगर पालिका मा. सुनील ( भाऊ ) त्र्यबंके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाची जोरदार तयारी चालू आहे , माघील १० वर्षांपासून या उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

स्वतः उभे राहून छोट छोट्या बारीक गोष्टीचे नियोजन हे सुनील त्र्यबंके आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्य यांनी केले आहे , शनिवार दिनांक १ जुलै रोजी दुपारी ३ वाजता ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तन होणार आहे , या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी सर्वानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन सुनील भाऊ त्र्यबंके यांनी केले आहे साय ६ वाजताह. भ. प. प्रसादजी शेटे महाराज यांची भजन संध्या होणार आहे . यानंतर सर्वांना महाप्रसादाचा आस्वाद घेता येणार आहे
रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी दुपारी ४ वाजता साई उत्सव प्रतिष्ठान तर्फे भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघणार आहे, हि शोभायात्रा या ठिकाणावरून जाणार आहे वसंतटेकडी, श्री , स्वामी समर्थ मठ, गुलमोहर रोड, जयहिंदचौक , शिलाविहार , श्रीरामचौक, संत नामदेवचौक , नित्यसेवा कॉलनी, दसरे नगर, या मार्गे संदेशनगर वसंत टेकडी साई मंदिरात शोभायात्रेची समाप्ती होईल यानंतर सर्वांना महाप्रसादाचा आस्वाद घेता येणार आहे.

सोमवार दिनांक ३ जुलै २०२३ रोजी गुरुपोर्णिमा असल्याने सर्वात पहिले साई बाबाचा अभिषेक, महापूजा, होमवहन, पौरोहित्य प्रसाद, देवा रिंगणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर ह. भ. प गौरक्ष दुतारे महाराज यांची भजन संध्या होईल.
या कार्यक्रमासाठी मा. आ. अरुणकाका जगताप ( विधानपरिषद सस्य महाराष्ट्र राज्य), मा. आमदार संग्रामभैय्या जगताप ( विधान सभा सदस्य महाराष्ट्र राज्य ) तसेच माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मा. आमदार शिवाजीराव कर्डीले यांची प्रमुख उपस्थितीत हा साई उस्तव संपंन्न होणार आहे तसेच तसेच आजी माजी खासदार, आमदार, महापौर , उपमहापौर , सामाजिक कार्यकतें विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अनेक मित्र मंडळे या उत्सवात सहभागी होणार आहेत .
या कार्यक्रमाच्या कार्यकारणी मंडळात समाजसेवक योगेश पिंपळे , निखिल त्र्यबंके, आकाश त्र्यबंके , दीपक कुडिया, महेश टाक , जितेंद्र कुमार टाक , बाबासाहेब सूर्यवंशी , प्रवीण पाटोळे, सचिन खोमणे, नारायण पालवे, सचिन ठोकळ , यांनी या संपूर्ण साई उत्सवाचे नियोजन केले आहे, माघील ५ दिवसापासून हे सर्व आपला जीव ओतून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत .
तसेच इतर काही लहान थोर मंडळी, व महिलांहि यामध्ये सहभागी झालेल्या आहे ,
