सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.19, वाढदिवसानिमित्त थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, मित्रजनांचे सहकार्य तसेच कार्यकर्ते व समर्थकांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आयोजित अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी केले. तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, माजी माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, नॅशनल सुत गिरणीचे संचालक अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, माजी जि.प.सभापती किशोर बलांडे, अशोक सूर्यवंशी, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, सिल्लोड न.प.गटनेता नंदकिशोर सहारे, राजेंद्र ठोंबरे, डॉ. मच्छिन्द्र पाखरे, जिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, मेघा शाह, दामूअण्णा गव्हाणे , गोपी जाधव, मुरलीधर काळे, राजू बाबा काळे , रमेश साळवे, सुखदेवराव जाधव, काकासाहेब राकडे, गजानन महाजन, दत्ता भवर, अजिंठा सरपंच नजीर अहेमद, दत्ता कुडके, सतीश ताठे, मारुती वराडे, व्यापारी महासंघाचे दुर्गेश जैस्वाल, आशिष कटारिया, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, रउफ बागवान, सुधाकर पाटील, सत्तार हुसेन, प्रशांत क्षीरसागर, शेख सलीम हुसेन, चांद बेग मिर्झा, आसिफ बागवान, रतनकुमार डोभाळ, मोईन पठाण, मतीन देशमुख, जितू आरके, रईस मुजावर, अकिल देशमुख, राजू गौर, बबलू पठाण, आदिंसह बाळासाहेबांची शिवसेना , युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्कलप्रमुख व्यापारी व मित्रमंडळाच्या सदस्य व कार्यकर्त्यांनी उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
बाळासाहेबांची शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच विविध सामाजिक संघटना , व्यापारी, मित्र मंडळाच्या वतीने शहरातील कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालय व शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याप्रसंगी सत्कारमूर्ती अब्दुल समीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना सत्कारमूर्ती अब्दुल समीर बोलत होते.
उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील बाभूळगाव येथे पेढे तूला, मोफत नेत्र तपासणी शिबिर, राजरत्न प्रतिष्ठानच्या वतीने ‘खीर दान’ , सकल नाभिक समाज बांधवांच्या वतीने सत्कार सोहळा, अंबादास प्रशाद नगर वासीयांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा, बालाजी नगर भागातील गणपती मंदिर येथे कळस पूजन व अभिष्टचिंतन सोहळा, स्नेहनगर येथे अभिष्टचिंतन सोहळा, त्यानंतर शाहू नगर भागातील श्री साईबाबा मंदिर व श्री म्हसोबा महाराज मंदिर जवळ व गणेश कॉलनी भागात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, क्रीडा स्पर्धा व विविध विकास कामांचे उदघाटन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते संपन्न झाले.
