आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर तेजीत आहेत. तर चांदी स्वस्त झाली आहे. सोन्याचे भाव 0.08 टक्क्यांनी वाढले आहे. तर चांदीचे भाव 0.58 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. बुधवारी चांदीचे दर 4 टक्क्यांनी वधारले होते. मात्र पुन्हा चांदीचे दर घरसले आहेत.
वायदा बाजारात गुरुवारी 55,079 रुपयांवर सोन्याचे दर पोहोचले होते. बाजार बंद होताना 170 रुपयांनी तेजी पाहायला मिळाली. 10 ग्रॅम सोन्यासाठी 54,820 रुपये मोजावे लागत आहेत. तर 1 ग्रॅम सोन्यासाठी 5,482 रुपये मोजावे लागत आहेत.
MCX वर चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीचा दर आज 13 रुपयांनी कमी होऊन 69,696 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा भाव वाढून 74,960 रुपये झाला आहे. काल पुन्हा एकदा हा भाव ६९,७७० रुपयांवर गेला. काल एमसीएक्सवर चांदी 47 रुपयांनी वाढून 69,689 रुपयांवर बंद झाली होती. मंगळवारी चांदीच्या दरात 2,118 रुपयांची वाढ झाली होती.