पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे
देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता देणाऱ्याचे
दोन्ही हात ही घ्यावे
अश्या प्रकारे पसायधान हॉटेलचे मालक श्री ,श्रीराम न्हाणे व बाळकृष्ण न्हाणे यांनी दि.13 रोजी पुणे_सोलापूर हायवे शेजारील स्वामी चिंचोली तालुका दौंड येथिल पसायधान हॉटेल च्या तिसऱ्या वर्धापनदिना निम्मित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना स्वादिष्ट रुचकर असे भोजन दिले शाळेतील मुलांनी जेवणाचा अस्वाद घेतला मुलांना हॉटेलमध्ये जेवायला मिळाल्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण होते व शाळेचे मुख्याध्यापिका रामगुडे मॅडम. व त्यांचे सहशिक्षक काळे मॅडम, पवार मॅडम,हिवरे सर, यांनी पसायदान व्हेज चे मालक श्रीराम नहाने व बाळकृष्ण नहाने यांचे आभार मानले शाळेच्या मुख्याध्यापिका रामगुडे मॅडम यांनी हॉटेल पसायदान व्हेज चे मालक सौ.ज्योती श्रीराम नहाने यांचे शाल श्रीफळ देऊन शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

हॉटेल पसायधान व्हेजच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य जयराम नहाने. माऊली नहाने. पप्पू मदने. गजानन नहाने. व संतोष नहाने. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामभाऊ शेंद्रे .उपस्थित होते…
