अहमदनगर, ता. १८ नगरमध्ये सातत्याने हिंदू समाजाला व व्यापाऱ्यांना टार्गेट केले जाते. आतापर्यंत सातआठ घटना घडल्यात व्यापायांच्या दुकानांसमोर टपऱ्या, हातगाड्या लावून अतिक्रमण करायचे, विचारणा केली तर दादागिरी करीत हल्ले करायचे, हे प्रकार बंद करा, नाही तर आमच्याशी गाठ आहे. पोलिस आणि महापालिका त्या गुन्हेगारांना पाठीशी घालते. त्यांना वाचविण्याच्या नादात तुमच्या नोकऱ्या जातील, असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी दिला.
“महाराष्ट्रातही यूपीसारखं होईल दुटप्पी अधिकाऱ्यांनो, कारवाईला सामोरे जा अधिवेशनात लक्षवेधी करावीच लागेल अंगावर याल तर शिंगावर घेऊ
कापड बाजारातील प्राणघातक हल्ला झालेल्या व्यापाऱ्यांची आज (मंगळवारी) आमदार राणे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. रामवाडी, गजराजनगर भागातही भेट देत त्यांनी पोडित कुटुंबांना दिलासा दिला. पोलिस अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला संबंधितांवर कारवाई करण्यास सांगितले
स्थानिक आमदारांचा महापालिका आणि पोलिसांवर दबाव आहे. तेच अशा घटनांना खतपाणी घालत आहेत. मात्र, त्यांना हिंदूंनीही मतदान केले आहे, हे लक्षात ठेवावे. आगामी निवडणुकीत ही लोकं तुमचा बेत पाहतील. मीही स्वतः त्यावेळी प्रचारासाठी नगरला येईन, अशा शब्दांत त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका केली.
