Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » २५ डिसेंबर १९४२अहमदनगर सरोज टॉकीज येथे स्वातंत्र्यवीर हबीब खान, रत्नम पिल्ले यांनी केला बॉम्बस्फोट.

२५ डिसेंबर १९४२
अहमदनगर सरोज टॉकीज येथे स्वातंत्र्यवीर हबीब खान, रत्नम पिल्ले यांनी केला बॉम्बस्फोट.

mahalokwaniBy mahalokwaniDecember 25, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

१९४२ ला महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीत जवाहरलाल नेहरू, मौलाना अबूल कलाम आझाद, वल्लभभाई पटेल, आचार्य कृपलानी यांच्यासह अनेक नेते अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात कैद झाल्याने आपण देशासाठी काहीतरी करावे हा विचार शहरातील रत्नम् पिल्ले, हबीबखान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्या मनात होता. त्यातून मग या तरुणांनी भूमिगत होऊन इंग्रजांचा संपर्क तोडण्यासाठी टेलिफोन वायर तोडणे, जाळपोळी, असहकार आंदोलन करण्याचे काम भिंगारसह अहमदनगरमध्ये सुरु केले.

एका क्रांतीकारकांने पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमधून बॉम्ब आणला. तो एका महिला क्रांतिकारकाने आपल्या पोटावर ठेऊन गर्भवती असल्याचे भासवून भिंगारला आणला. त्याचा स्फोट कोठे करायचा याचा विचार करून रत्नम पिल्ले, हबीबखान, पन्नालाल चौधरी, खोमणे यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली. ब्रिटीशांची गर्दी २५ डिसेंबरला संरोष टॉकीज येथे जास्त असते म्हणून ती जागा निवडण्यात आली. पिल्ले यांनी इशारा केल्यावर ताबडतोब हबीब खान यांनी बॉम्ब फेकला. यामध्ये काही ब्रिटिश अधिकारी मृत झाले तर अनेकजण जखमी झाले. हबीबखान हे मिलिटरी दवाखान्यात असल्याने आलेल्या ॲम्ब्युलन्समधून हे दोघे जखमींना घेऊन दवाखान्यात गेले. त्यामुळे कोणाला संशय आला नाही. त्यावेळेच्या मुंबई प्रांत म्हणजे गुजरात-महाराष्ट्र व मुंबई इलाख्याचा पहिला बॉम्बस्फोट होता. त्यानंतर पुणे व इतर ठिकाणी अशी मालिका सुरु झाली.

या घटनेची दखल कम्युनिस्ट फॉरवर्ड ब्लॉकचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती. त्यावेळी रेडिओवर “शाबास इंडिया” असे उदगार काढले होते. अहमदनगरचे स्वातंत्र्यसैनिक भाई सथ्था यांनी बॅरिस्टर नरिमन यांना मुंबईहुन बोलावून ‘सरोश बाँब खटला’ हि केस चालविण्यास सांगितले. बॅरिस्टर नरिमन यांनी युक्तिवाद करताना ऐकीव गोष्टीवर खटला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही असा युक्तिवाद केला. त्यामुळे चौघांना निर्दोष सोडण्यात आले पण हे परत बॉम्बस्फोट करतील म्हणून त्यांना ब्रिटिशांनी ३ वर्षे तुरुंगात डांबून ठेवले. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर १९४७ साली त्यांची सुटका झाली.

आज देशांमध्ये हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन द्वेष पसरवण्याची काही पक्ष संघटना प्रयत्न करत आहेत. ज्यांचा या स्वातंत्र्यलढ्याशी काडीमात्र संबंध नव्हता. उलट हि लोकं त्यावेळी इंग्रजांसोबत काम करत होती. आपल्या देशबांधवांवर अन्याय अत्याचार करत होती. सरकारी नोकऱ्या करत होती. इंग्रजी सत्तेचा लाभ घेत होती. त्यांनी या घटनेपासून प्रेरणा घ्यायला हवी. आपल्या देशासाठी आपले हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन व इतर समाज एकत्र येऊन लढले. त्यामध्ये रत्नम पिल्ले, हबीबखान व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांसाठी प्रेरणादायी काम केलेले आहे. ते सर्वजण जाती, धर्मभेदविरहित राहून आपल्या प्रिय भारत देशासाठी खांद्याला खांदा लावून लढले. त्यांचा वसावारसा आपण येत्या पिढ्यांनी घेऊन आपला भारत देश जगात सर्वोत्तम कसा होईल, यासाठी सतत समाजपरिवर्तनाचे काम करत रहाणे काळाची आहे. त्या दिशेने आपण एकजूटीने जावू या.

  • फिरोज़ चांद शेख.
    अहमदनगर, महाराष्ट्र.
    9273252888
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleस्वामी चिंचोली येथे  बेकादेशीर मुरम  उत्खननावर  महसूल विभागाची कारवाई
Next Article केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.