Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

mahalokwaniBy mahalokwaniJanuary 25, 2023Updated:January 25, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

औरंगाबाद : देशाच्या स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात केली होती. प्रत्यक्षात अजून एकही पद भरण्यात आलं नाही. अशातच आता पुढील 3 महिन्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की निवडणूक आहे म्हणून घोषणा करत नाही तर 2012 पासून भरती बंद होती ती आम्ही सुरू केली.

पोलिसांनी एफआयआर नोंदवताना काळजी घ्यावी.! अन्यथा पोलिसांवर पण होईल ही कारवाई

सर्वच जिल्ह्याने वाढीव मागण्या केल्या आहेत. जेवढ्या पूर्ण करता येणे शक्य आहे त्या पूर्ण केल्या जातील आचारसंहिता असल्यामुळे त्याची घोषणा करता येणे शक्य नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन आयोगाच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली आहे. औरंगाबाद मध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन विभागाची बैठक पार पडली. यावेळी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी खासदार आमदार उपस्थित होते.

बुधवारी सकाळी दहा वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरुवात झाली. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर तसेच महसूल उपायुक्त पराग सोमण सामान्य प्रशासन उपायुक्त जगदीश मिनियार यासह औरंगाबादचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांची उपस्थिती होती. बुधवारी साडेचार तास फडणवीस यांनी विभागांचा आढावा घेतला. यामध्ये लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यासाठी वाढीव निधी देण्यात येण्याची मागणी उपमुख्यमंत्राकडे केली तसेच औषधी आरोग्य संदर्भातील विविध प्रश्न यावर चर्चा करत त्यासाठी जास्तीचा निधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दौंड तालुक्यात भीमा नदिच्या पात्रात पाच दिवसात 4 मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ.

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात 75 हजार पदांच्या नोकर भरतीची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात कुठल्याच भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे 75 हजार पदांची भरती म्हणजे नुसते गाजर असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला आहे. जानेवारी महिन्यात जर भरती प्रक्रिया सुरु झाली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे.

स्पर्धा परीक्षार्थींनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पोलीस शिपाई भरती सोडल्यास वर्ग तीन आणि वर्ग चार पदांच्या भरतीच्या कोणत्याच मोठ्या जाहिराती आलेल्या नाहीत. महाराष्ट्रात एकूण रिक्त पदांची संख्या लाखांच्या जवळपास आहे. 75 हजार पदभरतीची घोषणा करुन तीन ते चार महिने उलटून गेले. मात्र प्रत्यक्षात जाहिरात प्रसिद्ध होत नाही. या विरोधात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ट्विटरवर सुद्धा आपल्या मागण्यांसाठी मोहीम सुरु केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी महालोकवाणीवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट महालोकवाणीवर.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleसामुदायिक हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमांमुळेच संस्कृतीचा वारसा जतन होण्यास मदत – अभिनेत्री प्रार्थना बेहेरे
Next Article पहिल्यांदा अशा प्रकारे साजरा झाला प्रजासत्ताक दिन, जाणून घ्या कशी सुरू झाली परंपरा..
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.