Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » महावीर कनिष्ठ महाविद्यालयास प्रा.सचिन सर गायवळ यांची सदिच्छा भेट,

महावीर कनिष्ठ महाविद्यालयास प्रा.सचिन सर गायवळ यांची सदिच्छा भेट,

mahalokwaniBy mahalokwaniAugust 16, 2023Updated:August 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राजेंद्र कोठारी यांच्या महावीर कनिष्ठ महाविद्यालयास प्रा.सचिन सर गायवळ यांची सदिच्छा भेट,15 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात धोंडे व स्नेहभोजनाचा घेतला आस्वाद, जामखेड मध्ये राजकीय भुवया उंचावल्या..

याबाबत माहिती अशी की राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते मा. राजेंद्रजी कोठारी हे दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी कै. सुभाष कोठारी शैक्षणिक,सामाजिक व क्रीडा विकास संस्था जामखेड संचलित महावीर कनिष्ठ महाविद्यालय व जूनियर कॉलेजमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित करतात त्यानंतर 25 वर्षापासून जामखेड मधील मित्रपरिवार आप्तेष्ट व विविध सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवून स्नेहसंबंध जपण्याचा प्रयत्न करून जातीय व सामाजिक सलोखा राखण्याचे काम करीत आहेत.

त्यामुळे आमंत्रित सर्वच मान्यवर व जामखेडकर या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद न चुकता घेत असतात. या कार्यक्रमात विशेष निमंत्रित असणारे सामाजिक कार्यकर्ते प्रा. सचिन सर गायवळ यांना राजेंद्र कोठारी यांनी आग्रहाचे निमंत्रण दिले होते,त्या आमंत्रणाचा स्वीकार करून गायवळ यांनी भेट दिली, यावेळी प्रा.गायवळ यांना कोठारी यांनी प्रेमाने धोंडे खाऊ घातले व स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी महावीर कनिष्ठ महाविद्यालय व ज्युनियर कॉलेजला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तसेच सरांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्राची गुणवत्ता व क्रीडा विभागाची माहिती घेऊन खेळाडू तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. परंतु या दोन नेत्यांच्या भेटीने जामखेड तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय जाणकारांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. मध्यंतरी जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातील गटबाजी मुळे नाराज झालेल्या प्रा.सचिन सर गायवळ यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता पसरली होती.

राजेंद्र कोठारी हे पूर्वीपासूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात राजकीय चानाक्षबुद्धी असणारे कोठारी यांची प्रा.सचिन गायवळ यांच्याबरोबर झालेल्या भेटीने ते राजकीय गळ घालून त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय करतात का हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे?एक मात्र खरे आहे की या नेत्यांच्या भेटीमुळे पुन्हा जामखेडमध्ये तर्क वितर्कला उधान आले आहे.
याप्रसंगी पत्रकार दत्तराज पवार यासीन भाई शेख उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleJamkhed | ल.ना.होशिंग विद्यालयामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती तृणधान्य जागरूकता अभियान संपन्न
Next Article डॉ. सुधा कांकरिया दिल्ली सरकारच्या राष्ट्रीय एकता पुरस्काराने सन्मानित..
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.