Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
mahalokwani
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
mahalokwani
Home » ब्रेकींग न्यूज » Ahilyanagar |अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; या ठिकाणच्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून केली ११ महिलांची सुटका
ब्रेकींग न्यूज

Ahilyanagar |अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; या ठिकाणच्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून केली ११ महिलांची सुटका

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 12, 2025Updated:February 12, 2025No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

पिटा कायदयांतर्गत कारवाई

मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर Ahilyanagar यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

CIBIL Score| तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..!

Ahilyanagar |अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; या ठिकाणच्या वेश्याव्यवसायावर छापा

नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई/ तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापुसाहेब फोलाणे, अतुल लोटके, गणेश लोढे, संतोष खैरे, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रोहित येमुल, भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.


दिनांक 12/02/2025 रोजी पथकातील पोसई/तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारा मार्फत साई लॉजींग, रूईछत्तीसी,ता.अहिल्यानगर Ahilyanagar येथे इसम नामे भैय्या उर्फ गणेश संपत गोरे, रा.रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर हा त्याचे साथीदारासह महिलाकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तपास पथकाने सदरची माहिती पोनि/राजेंद्र इंगळे, एएचटीयु, अहिल्यानगर यांना दिली.त्यानंतर तपास पथक पोनि/राजेंद्र इंगळे यांचेसह छापा कारवाई करणेबाबत रवाना झाले.



तपास पथकाने अहिल्यानगर Ahilyanagar ते सोलापूर महामार्गावरील रूईछत्तीसी येथील साई लॉजींग येथे चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणुन पाठविले.तपास पथकाने नमूद लॉजींगमध्ये वेश्याव्यवसाय चालू असलेबाबत खात्री पटल्यानंतर पंचासमक्ष लॉजींगवर छापा टाकुन इसम नामे शंभु उर्फ शुभम अशोक पाळंदे, वय 29, रा.मुलणमाथा, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातुन 20,000/- रूपये किंमतीचा एक मोबाईल व 1,000/- रूपये रोख रक्कम असा एकुण 21,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन पंचासमक्ष विचारपूस केली असता साई लॉजींग हे भैय्या उर्फ गणेश संपत गोरे, रा.रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर व त्याचा साथीदार मनोज आसाराम गावडे, रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड असे वेश्या व्यवसाय करतात.तसेच राणा, रा.मुंबई पुर्ण नाव माहित नाही हा त्यांना

Table of Contents

  • Ahilyanagar |अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; या ठिकाणच्या वेश्याव्यवसायावर छापा

वेश्याव्यवसायाकरीता महिला पुरवितो अशी माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपी शुभम अशोक पाळंदे याचेसह साई लॉजींगची पाहणी करता लॉजींगमधील रूममध्ये 11 महिला मिळून आल्या.नमूद महिलाकडे विचारपुस करता त्यांनी भैया गोरे, मनोज गावडे यांनी राणा याचे मार्फतीने आम्हास वेश्या व्यवसायाकरीता आणल्याचे सांगुन, ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधुन आम्हास पैस देतात व आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती सांगीतली.नमूद पथकाने वर नमूद महिलांची सुटका केलेली आहे.



तपास पथकाने दिनांक 12/02/2025 रोजी साई लॉजींग, रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर येथे छापा टाकुन केलेल्या कारवाईमध्ये आरोपी नामे 1) भैय्या उर्फ गणेश संपत गोरे, रा.रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर (फरार) 2) मनोज आसाराम गावडे, रा.धानोरा, ता.आष्टी, जि.बीड (फरार) 3) शुभम अशोक पाळंदे, वय 29, रा.मुलनमाथा, ता.राहुरी, जि.अहिल्यानगर 4) राणा पुर्ण नाव माहित नाही (फरार) हे स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता 11 महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द मपोहेकॉ/2233 भाग्यश्री गंगाधर भिटे, नेम.स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 71/2025 बीएनएस 143 (3), 3 (5) सह स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 6, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशन करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर व मा.श्री.संपतराव भोसले, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

#ahilyanagar #lodge #sex
Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleCIBIL Score| तुमचा सिबिल स्कोर इतका आहे ना..? नाहीतर लग्न मोडेल; घडली धक्कादायक घटना..!
Next Article MIDC पोलीस व अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
mahalokwani
  • Website

Related Posts

ssc result 2025| 10 वीचा निकाल या दिवशी लागणार; रिझल्ट, कुठे चेक कराल ? जाणून घ्या एका क्लिकवर

May 12, 2025

todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव

May 11, 2025

sharad pawar| शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींचे कौतुक, काय म्हणाले शरद शरद पवार

May 9, 2025

ssc result 2025| 10 वीचा निकाल या दिवशी लागणार; रिझल्ट, कुठे चेक कराल ? जाणून घ्या एका क्लिकवर

todays Onion Rate | कांद्याच्या दरात मोठी घसरण निर्यात पूर्णपणे ठप्प; पहा किती भाव

sharad pawar| शरद पवारांकडून पहिल्यांदाच मोदींचे कौतुक, काय म्हणाले शरद शरद पवार

new mobile| नवीन मोबाइलला घेयाचा पण तुमच्याकडे पैसे नाही ; असा मिळवा नवीन मोबाईल

Sindoor वर शरद पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Mahanagarpalika | मोठी बातमी लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजणार; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

supriya sule | या प्रकरणात पोलिसांवर कारवाई करा, सुप्रिया सुळे यांची मागणी

Ram shinde| पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयात सभागृह इमारतीसाठी १४ कोटी ३२ लाख रूपये मंजूर – सभापती प्रा.राम शिंदे

hsc result 2025 | राज्यात यंदा बारावीच्या’ निकालाची टक्केवारी घसरली; यांनी मारली बाजी

© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.