Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Ajit Pawar | अजितदादांचा संताप – नाक खुपसायचं काम करू नका
ब्रेकींग न्यूज

Ajit Pawar | अजितदादांचा संताप – नाक खुपसायचं काम करू नका

mahalokwaniBy mahalokwaniAugust 16, 2025Updated:August 16, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

तुम्ही आमच्या पक्षात उगाच नाक खुपसू नका. आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असा खणखणीत टोला अजितदादांनी लगावला. आज सकाळी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना दादांनी टीका करणाऱ्यांचा सडकून समाचार घेतला आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही, अजितदादा भडकले कुणावर? म्हणाले नाक खुपसायचं काम नाही अजित पवार Ajit Pawar भडकले

Mudra Loan|50000 ते 10 लाखांपर्यंत मुद्रा कर्ज योजना 2023; कर्ज वाटप सुरवात कोणत्याही बँकेशी संपर्क करा झटपट कर्ज मिळवा.!

अजित पवार Ajit Pawar यांनी सकाळीच विरोधकांना चांगलेच ठणकावले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. तुम्ही आमच्या पक्षात उगाच नाक खुपसू नका. आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही असा खणखणीत टोला अजितदादांनी लगावला. आज सकाळी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना दादांनी टीका करणाऱ्यांचा सडकून समाचार घेतला. पण दादा नेमके कुणावर संतापले असा तुम्हाला प्रश्न पडला असेल, चला तर जाणून घेऊयात.

Ajit Pawar | अजितदादांचा संताप


“आम्ही आमच्या पक्षात काय करावं हे बाकीच्यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं.राज्यात काहींना असं वाटायला लागलं आहे की, आपण फारच मोठे नेते झालो आहोत. आणि महाराष्ट्राचा सगळा मक्ता त्यांनाच दिला असे ते वागायला लागले आहेत. ठीक आहे बोलण्याचा ज्याचा त्याचा तो अधिकार आहे. पण त्यांनी अगोदर त्यांचा पक्ष सांभाळावा, इतर पक्षात नाकं खुपसण्याचे काम करू नये,” असा सणसणीत टोला अजितदादांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना लगावला आहे.

रोहित पवार हे सातत्याने राष्ट्रवादी अजित पवार गटावर हल्लाबोल करत आहेत. त्यांनी यापूर्वी दोन तीन मंत्र्यांना चांगलेच अडचणीत आणले होते. दादा गटाच्या आमदारांची नाराजी त्यांनी ओढावून घेतली होती. त्यांच्या शेलक्या शब्दांचे मार अनेक आमदारांना बसले. त्यावरून राष्ट्रवादी गट रोहित पवार यांच्यावर तापलेला आहे. त्यातच रोहित पवारांनी काल मोठे वक्तव्य केले होते. त्यावरून आज अजितदादांनी त्यांचे कान टोचले. विशेष म्हणजे कोल्हापूर येथे त्यांनी रोहित पवारांवर टीका केली. तर सांगलीत एका कार्यक्रमात काका-पुतणे एकाच मंचावर आल्याचे दिसले.

Table of Contents

  • Ajit Pawar | अजितदादांचा संताप

काय म्हणाले होते रोहित पवार

सूरज चव्हाण यांचे मारहाणीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर त्यांचे पद काढून घेण्यात आले. तर आता त्यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांची नियुक्ती केली. त्यानंतर रोहित पवार यांनी तटकरे यांच्यावर खोचक टीका केली. रोहित पवार यांनी ट्विट करत त्यावर आसूड ओढला होता. अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजपप्रेमी गट जाणूनबुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी काम करतो असे ते म्हणाले. शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठीच सूरज चव्हाण यांची नियुक्ती केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. तर तटकरे यांनी ते बालिश असल्याची टीका केली होती.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSarode chichondi patil | चिचोंडी पाटील : 12 वर्षांनंतर सरोदे कुटुंबाला मिळाला न्याय; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 गुंठ्यांचा सातबारा प्रदान
Next Article electric scooter| ही स्कूटर ठरतीये स्कूटर प्रेमींची पहिली पसंती, किंमत 81 हजार रुपये
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.