Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Asia Cup 2023 । भारताच्या ‘गदर’ समोर पाकिस्तान ‘गारद’; पराभवानंतर कर्णधार बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर..

Asia Cup 2023 । भारताच्या ‘गदर’ समोर पाकिस्तान ‘गारद’; पराभवानंतर कर्णधार बाबर आझमला बसला मोठा धक्का, वाचा सविस्तर..

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 12, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Asia Cup 2023 : किंग कोहली आणि जिगरबाज के एल राहुल यांनी झळकावलेल्या चमकदार शतकांच्या जोरावर आणि केलेल्या नाबाद द्विशतकी भागीदारीच्या जोरावर साडेतीनशे धावांचा डोंगर उभा करणाऱ्या भारताने गोलंदाजी करतानाही पाकला शरण आणले.

टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने 5 विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकुर, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांनी 1-1 विकेट घेतली. त्याआधी विराट कोहली-केएल राहुल या जोडीने नाबाद शतकी खेळी केली. तर रोहित शर्मा-शुबमन गिल या जोडीनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली. टीम इंडियाने या आधारावर 50 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावून 356 धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी आणि शादाब खान या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

📸📷: How about that for a win for #TeamIndia! 🙌 🙌#AsiaCup2023 | #INDvPAK pic.twitter.com/EgXF17y4z1

— BCCI (@BCCI) September 11, 2023

बाबर आझमला मोठा धक्का बसला

Asia Cup मध्ये भारताविरुद्धच्या दारूण पराभवानंतर पाकिस्तान कर्णधार बाबर आझमला मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचे तीन खेळाडू जखमी झाले आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये पाकिस्तानचे स्टार गोलंदाज हरिस रौफ आणि नसीम शाह खेळणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज आगा सलमानही रूग्णालयात असून तोही स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो.

Asia Champion | मल्ल सुजय तनपुरेनी भारताला मिळून दिले; आशिया चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक.!

काय म्हणाला बाबर आझम?

“पावसाचं काय आमच्या हातात नव्हतं. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात आम्ही अपयशी ठरलो. आमच्या गोलंदाजांनी सुरुवातीला चांगल्या योजना आखल्या. तसंच झालं पण विराट आणि राहुलने त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं. तसेच जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी पहिली दहा षटकं चांगली टाकली. आमची फलंदाजी तितकी चांगली झाली नाही.”, असं पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याने सांगितलं.

पाकिस्तानचे (Asia Cup ) मोठे नुकसान झाले

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाला 2 गुण मिळाले. श्रीलंका आणि पाकिस्तानचेही प्रत्येकी दोन गुण आहेत. तथापि, रोहित ब्रिगेडचा नेट रन रेट (+4.594) श्रीलंका-पाकिस्तानपेक्षा खूपच चांगला आहे, ज्यामुळे संघ सुपर-4 गुणांच्या टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.

पाकिस्तान पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट (-1.892)आहे. श्रीलंकेचा निव्वळ धावगती +0.420 आहे आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत. सलग दोन पराभवांमुळे बांगलादेश (0.749) तळाच्या चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेश स्पर्धेतून बाहेर आहे.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous Articleगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांचा दणका; कर्तव्यात कसूर करणारा शिक्षक नितिन बोराटे निलंबित.
    Next Article जामखेड शहरात आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दहीहंडीचा दिमाखदार सोहळा संपन्न..
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.