तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ; डॉ. मोरेला खडी फोडायला लावणार – आ.प्रा.राम शिंदे
जामखेड प्रतिनिधी
Bhaskar More Arrested इंदापूर तालुका पळसवाडा येथे डॉ भास्कर मोरेंना अटक
डॉक्टर भास्कर मोरे यांना स्थानिक गुन्हे शाखेने भिगवन इंदापूर ( पळसवाडा) येथून ताब्यात घेतले Bhaskar More arrested आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.
आमदार प्रा. राम शिंदे यांनी संपर्क सांधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी
— Sachin Kamble (@SachinK91465152) March 13, 2024
आमदार प्रा.राम शिंदे आक्रमक होताच; डॉ भास्कर मोरे अटक pic.twitter.com/HBt6YaxrHC
आज जामखेड jamkhed शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. याच अनुषंगाने आज बुधवार दि. १३ रोजी आमदार प्रा. राम शिंदे यांनी उपोषण स्थळी जाऊन पाच तास विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना जाणून घेतल्या.
यावेळी आमदार प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, माझ्या राजकीय कारकीर्दीतील महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे आंदोलन आहे. याची मला जाणीव आहे. तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. तुमचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. मोरेला खडी फोडायला लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..
मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांशी साधला दुरध्वनीवरुन संवाद
रत्नदीप मेडिकल कॉलेजवर कारवाई होण्यासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमदार प्रा. राम शिंदे यांनी भेट घेऊन पाच तास विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना जाणून घेतल्या नंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आमदार प्रा राम शिंदे यांनी स्पीकर ऑन करून संवाद साधला यावेळी मोरे यांच्या ७ ही कॉलेजची मान्यता दोन दिवसात रद्द करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी आंदोलन कार्यकर्त्यांशी विद्यार्थ्यांना दुरध्वनी करून दिले.
Table of Contents
पुढे बोलताना आ.प्रा.राम शिंदे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. तसेच रिव्हॉल्वर चे लायसन्स रद्द करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अतिशय तीव्र स्वरूपाच्या तक्रारी आहेत. त्या शासन दरबारी मांडल्या आहेत याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. रत्नदीप मेडिकल फाउंडेशन आवारात वनविभागाला मृत हरणाचे काही अवशेष सापडले आहेत आणि ते नागपूर येथे फॉरेन्शिक लॅबकडे पाठवले आहेत. तो तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर मोरे जर दोषी आढळले तर खडी फोडण्यापेक्षा हा गुन्हा कडक आहे असे मत आ. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी आण्णासाहेब सावंत, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,शरद कार्ले ,आरपीआय चे सुनील साळवे, रवि सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी,केदार रसाळ, बिभीषण धनवडे,पोपट राळेभात, सोमनाथ राळेभात,पवन राळेभात, ॲड.प्रविण सानप,प्रविण चोरडिया, प्रा संजय राऊत,वैजिनाथ पाटील,बाजीराव गोपाळघरे,मोहन मामा गडदे,अर्जुन म्हेत्रे,अल्ताफ शेख, मोहन देवकाते,उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.

नामदार एकनाथराव शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनच्या तक्रारी विरोधात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठित करून लवकरात लवकर उच्च स्तरीय चौकशी करू. यामध्ये कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. तसेच मोरे याची एसआयटी मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनी वरून उपोषणकर्ते पांडूरंग भोसले व विद्यार्थांना दिले.
पांडुरग मधुकर भोसले ( उपोषणकर्ते) श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जामखेड तालुका
विद्यार्थ्याचा संपूर्ण विषय (RMF बंद, पर्यायी परीक्षा केंद्र व बाकी विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी भरलेल्या फी मद्ये पर्यायी संस्थेत ॲडमिशन यांसारखे विद्यापिठासंदर्भातील उर्वरित सर्व प्रश्न ) हे विषय लेखी मार्गी लागे पर्यंत उपोषण व आंदोलनावर ठाम
