जामखेड प्रतिनिधी
रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विविध फॅक्लटिच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून गेले आठ दिवसांपासून शेकडो विद्यार्थ्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे.या आंदोलनाला आमदार रोहित पवार, आमदार प्रा राम शिंदे व विविध संघटना ,पक्षाचे पदाधिकारी व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहे.पांडुरंग भोसले म्हणाले जो पर्यंत लेखी मिळत नाही ,तो पर्यंत उपोषण सोडणार नाही .
old car |फोरव्हीलर कार फक्त २ लाख ते ४ लाखांमध्ये; या कंपन्यांच्या कार उपलब्ध..
रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. सर्वस्तरावर सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. मुलांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भुमिका आहे. भास्कर मोरे Bhaskar moreकडून विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक व अर्थिक पिळवणूक होत आहे. दि. ८ मार्च रोजी त्याचेवर विद्यार्थीनीचा विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे तसेच वन्य प्राणी अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Bhaskar more | जो पर्यंत लेखी मिळत नाही; तो पर्यंत उपोषण सोडणार नाही- पांडुरंग भोसले
याशिवाय गेली सहा महिन्यांपूर्वीही त्याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यागुन्हात तो सुप्रिम कोर्टाने दिलेल्या जामिनावर आहे. मोरेच्या कु- कृत्यांबाबत त्याच्या बरोबर रत्नदीप फौंडेशनच्या सर्वच संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
भास्कर मोरेने Bhaskar more एकच इमारत अनेक वेळा दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक कोर्सेस ला मान्यता मिळवली, कॉलेजचे हॉस्पिटल नाही, मुलींना ब्लॅक मेल करणे, सर्व विद्यार्थ्यांना बंदूकीचा धाक दाखवणे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप हडप करणे, त्यांचा बॅक ठेवणे, यासह अनेक वेगवेगळ्या पध्दतीने विद्यार्थ्यांची पिळवणूक करणाऱ्या भास्कर मोरेच्या कुकृत्यांनापडदा फास होत नाही तोपर्यंत अंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा उपोषणकर्ते पांडूराजे भोसले यांनी दिला आहे.
Table of Contents
जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसी चे विद्यार्थीनीचे विनयभंग प्रकरनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे Bhaskar more यास स्थानिक गुन्हे शाखेने भिगवन इंदापूर येथून ताब्यात घेतले आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत हे सुरूच राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
