दलित आणि बहुजन समाज रोहित पवार यांच्या पाठीशी
जामखेड प्रतिनिधी
कुठल्याही संतानी आपल्याला सांगितलं नाही ,जाती- जाती मध्ये , धर्मा धर्मा मध्ये तेढ निर्माण करा हा वाद आणि द्वेष या महाराष्ट्र आणि देशात कोण पसरवत असेल तर खऱ्या अर्थाने एका राजकीय पक्षाचे नाव प्रामुख्याने पुढं येत ते म्हणजे भाजपा BJP असे मत महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार Rohit Pawar यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरातील राज लाॅन्स येथे आयोजित बहुजन निर्धार संकल्प मेळाव्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी जेष्ठ नेते प्रकाश सदाफुले, बबन तुपेरे, सुनील जावळे, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक,पोपट फुले,शिवाजी ससाणे, राकेश घायतडक,संभाजी आव्हाड, विक्रांत अब्दुले, अमोल सदाफुले,योगेश घायतडक, कबीर घायतडक,दिपक घायतडक,शेखर तुपेरे,शेखर तुपेरे, गोकुळ महाजन आदी दलित व बहुजन समाजातील बांधव,माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
BJP| धर्मा-धर्मामध्ये तेढ निर्माण करणे हा भाजपचा डाव
या मेळाव्यासाठी प्रवक्ते अजिंक्य चांदणे, प्रवक्ते शेख सुभान अली, प्रवक्ते अशोक गायकवाड, प्रवक्ते शिवराज साळवे हे प्रमुख उपस्थित होते.या मेळाव्यासाठी सर्व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्व दलित व बहुजन समाजांनी असा निर्धार केला की, सर्व दलित व बहुजन समाज हा रोहित पवार यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की,द्वेषाच राजकारण आपल्या सर्वांना विभागून ठेवत.धर्मा धर्मामध्ये वाद लावून राजकीय पोळी भाजली जाते.नेता मोठा होतो, पार्टी मोठी होते.गरिब गरिब राहतात,कधीही मोठे होत नाही.महापुरुषांनी आपल्याला जे विचार सर्वांना दिले आहे ,ते अतिशय महत्त्वाचे विचार दिले आहेत.भाजपा नेते पाशा पटेल यांचा समाचार घेत रोहित पवार यांनी सांगितले, की अशा व्यासपीठावर मी असतो तर अशा फालतू वक्ता त्याठिकाणी आला असता तिथल्या तिथ वक्त्याला म्हणलो असतो ,बास करा आता निट घरी जावा.मी सुध्दा तुम्हाला सोडणार नाही .आशा लेवलची भाषा समोरच्या पक्षाच्या उमेदवाराच्या सभेत बोलली जात होती.राम शिंदेना काय माहित कदाचित काय बोलायचं,कसं बोलायचं महान विचार काय असतात हे कुठे माहित आहे.त्यांना मला एवढेच सांगायचे आहे,की बहुजन समाज निर्धार मेळावा आहे.हे जे व्यासपीठ पवित्र आहे .या व्यासपीठावर जे विचार मांडण्यात आले .ज्यांचे विचार येथे मांडण्यात आले, ते अतिशय महत्त्वाचे असून आपल्या सर्वांना दिशा देणारे आहेत.त्यामुळे आमच्याकडून एवढ्या खालच्या लेवला टीका होणार नाही.
यावेळी बोलताना प्राध्यापक घायतडक म्हणाले की,बहुजन समाज हा रोहित पवारांच्या पाठिशी राहणार आहे.आमदार रोहित पवार यांनी शहरात संविधान स्तंभ व बुध्द विहार मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पंरतु त्यांचा निवडणुकीत मुद्दा बनवून घोषवारा केला नाही.पंरतु समोरील उमेदवार प्रा. राम शिंदें यांनी बुद्ध विहार मंजूर केले असे सांगून ते दलित समाजाला धार्मिक मुद्यांवर मते मागत आहेत.भारतीय जनता पार्टी चे जातीयवादी असून धर्मावर राजकारण करत आहेत.” संविधान बचाओ,भाजपा हटाओ.” येणाऱ्या काळात रोहित पवार यांनी दलित व बहुजन समाजाच्या अडी अडचणीशी कटिबद्ध राहून काम करावे.
या बहुजन निर्धार संकल्प मेळाव्यासाठी उपस्थित नेते
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, जेष्ठ नेते वैजिनाथ पोले,दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, प्रकाश काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य कलिमुल्ला कुरेशी,उमर कुरेशी,नरेंद्र जाधव, बाबासाहेब मगर,प्रवक्ते डॉ कैलास हजारे,इमरान कुरेशी,इस्माईल सय्यद, प्रशांत राळेभात,वसीम सय्यद, समीर चंदन, बापूसाहेब कार्ले, अमोल गिरमे,अर्शद शेख, पांडुरंग माने,एडवोकेट महारूद्र नागरगोजे,अरुण डोळस, मच्छिंद्र जाधव, प्रशांत वारे, दत्ता डिसले, बिलाल शेख,सोहेल बागवान आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुजित उबाळे यांनी केले.
