Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Breaking News| डॉ. भास्कर मोरे यांची तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी राष्ट्रीय महिला व राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी – जामखेड वकील संघाची मागणी

Breaking News| डॉ. भास्कर मोरे यांची तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी राष्ट्रीय महिला व राज्य महिला आयोगाकडे तक्रार करावी – जामखेड वकील संघाची मागणी

mahalokwaniBy mahalokwaniMarch 7, 2024Updated:March 7, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला जामखेड तालुका वकील संघाचा जाहीर पाठिंबा

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर येथे शिक्षण घेत असणारे बी फार्मसी चे विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांची रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याकडून होत असलेल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक छळास कंटाळून उद्विग्न झालेल्या मुला – मुलींच्या आमरण उपोषणाला जामखेड तालुका वकील संघाचा जाहीर पाठिंबा आज रोजी देण्यात आला आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, रत्नदीप मेडिकल फाउंडेशन कॉलेज येथे बी ए एम एस ,बी एच एम एस, डी फार्म, बी फार्म, एम फार्म नर्सिंग असे अभ्यासक्रम शिकवले जातात. या सर्व शिक्षणासाठी राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो मुले – मुली प्रवेश घेतलेला आहे या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे हे मुला – मुलींचे वारंवार आर्थिक, मानसिक व शारीरिक छळ करत आलेले आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून तो या प्रकरणी आज रोजी जामिनावर आहे. या कॉलेजमध्ये आवश्यक शिक्षक स्टाफ , लॅब प्रात्यक्षिक सुविधा उपलब्ध नाही.

त्यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ नियमानुसार कोणतेही योग्य प्रशिक्षण व शिक्षण मिळत नसून गैर मार्गाचा वापर करून फक्त पास करून देण्याची हमी दिली जाते व त्या मोबदल्यात आर्थिक व्यवहार केले जातात. जे विद्यार्थी पूर्ण प्रशिक्षण व शिक्षणाचा आग्रह धरतील व त्यांच्या गैरमार्गात सहभागी होण्यास नकार देतील त्यांना दम देणे मुलींना कॅबिनमध्ये बोलून घेऊन मानसिक व शारीरिक छळ करणे असे प्रकार खुद्द संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्याकडून केले जात आहेत हे अत्यंत गंभीर आहे.

या कॉलेजमध्ये मुली अजिबात सुरक्षित नाहीत ही गंभीर परिस्थिती आहे.म्हणून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी तातडीने याची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे व राज्य महिला आयोगाकडे करून त्यांना निमंत्रित करून सखोल चौकशी करावी तसेच सक्षम महिला पोलीस अधिकारी निमंत्रित करून मुलींच्या मानसिक शारीरिक शोषणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.

याकरिता समस्त रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे विद्यार्थी व विद्यार्थिनींना उपोषण करता जामखेड तालुका वकील संघाचा जाहीर पाठिंबा आहे. यावेळी अध्यक्ष ॲड शमा हाजी कादर, उपाध्यक्ष, ॲड नितीन घुमरे, सचिव ॲड कृष्णा शिरोळे,ॲड संग्राम पोले,ॲड महारुद्र नागरगोजे, ॲड पोपट कात्रजकर,ॲड जैद सय्यद,ॲड बाळासाहेब घोडेस्वार,ॲड सुमित बोरा,ॲड मोहन कारंडे,ॲड प्रदीप बोलभट, ॲड प्रविण ससाणे, ॲड
नितीन राजपूरे,ॲड अजिनाथ जायभाय आदी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleWomen’s Day| महिला सक्षमीकरणासाठी कायदा महिलांच्या पाठीशी- प्रथम वर्ग न्यायाधीश वैभव जोशी
Next Article Dr. bhaskar more crime| डाॅ.भास्कर मोरे ला अटक होणार का ? यावेळेस तरी पोलिसांच्या हाती लागणार का मोरे ..?
mahalokwani
  • Website

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.