Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Cyclone Biparjoy : बिपोरजॉय वादळाने मान्सूनवर झाले हे परिणाम; या दिवशी होईल मान्सूनचे आगमन.!

Cyclone Biparjoy : बिपोरजॉय वादळाने मान्सूनवर झाले हे परिणाम; या दिवशी होईल मान्सूनचे आगमन.!

mahalokwaniBy mahalokwaniJune 17, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

गुजरातच्या किनारपट्टीवर बिपोरजॉय वादळाचा Cyclone Biparjoy जोर आता ओसरत आहे. मध्यरात्रीपर्यंत हा कहर सुरू होता. वादळ ताशी 15 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. या वादळामुळे रात्रभर पाऊस सुरू राहणार असल्याचे काल हवामान खात्याने म्हटले होते. वादळाला कच्छच्या जाखाऊ बंदरात पोहोचण्यासाठी सुमारे 2 तास लागले. पुढील 5 ते 6 तास सौराष्ट्र आणि कच्छसाठी आव्हानात्मक असणार आहेत, असे काल हवामान विभागाचे डीजी मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले होते.

Cyclone Biparjoy बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास संथगतीने होत असून, १८ ते २१ जूनदरम्यान त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. चक्रीवादळ अरबी समुद्रात अत्यंत हळूवारपणे पुढे सरकत असल्याने नैऋत्य मौसमी वाऱ्यांना चालना मिळत नसल्याचे दिसत आहे.

वादळाच्या लँडफॉलची प्रक्रिया सायंकाळी 6 वाजल्यापासून सुरू झाली होती, जी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू होती. गुजरातमधील कच्छ, भुज, द्वारका, जामनगर, वडोदरा यासह अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. द्वारकेसह अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून विजेचे खांब पडले आहेत. त्याचबरोबर कच्च्या घरांचेही नुकसान झाले आहे.

Cyclone Biparjoy हे वादळ ताशी 115 ते 125 किलोमीटर वेगाने किनारपट्टी ओलांडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले होते. काही ठिकाणी चक्रीवादळाचा वेग 140 पर्यंत जाईल. अंधारामुळे यावेळी दिवसा दिसली तशी ती चित्रे दिसत नव्हती, मात्र वादळ आणि पाऊस भितीदायक होता.

सध्या मुंबईमध्ये पडणारा पाऊस हा मान्सून पावसाचे संकेत आहेत. उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपर्यंत सर्वदूर पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता आहे. त्यानंतर शनिवार, रविवारी तो थोडा कमी होईल. दक्षिण कोकणात गुरुवारी अनेक ठिकाणी पावसाची उपस्थिती अपेक्षित आहे. मात्र त्यानंतर पुन्हा रविवारपर्यंत पाऊस कमी असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यावेळी गुजरातमधील लोक कसे भयानक वादळाचा सामना करत आहेत. बिपोरजॉयचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून किनारी भाग रिकामा करण्यात आला.

#CycloneBiporjoy #mahalokwani #Gujarat pic.twitter.com/K8dGvAAxri

— Mahalokwani (@mahalokwani) June 17, 2023

गुजरात सरकार वादळाच्या संदर्भात कारवाई करत आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत होते. त्याच वेळी, यापूर्वी राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हर्ष सिंघवी यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे क्षणोक्षणी माहिती घेतली.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेडमध्ये जागतिक मल्लखांब दिन मोठ्या उत्साहात साजरा.!
Next Article आमदार रोहित पवार यांनी पूर्ण केली निवारा बालगृहातील मुलांची इच्छा; दिली ही खास भेट वस्तू.!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.