पुणे जिल्हा प्रतिनिधी: बबनराव धायतोंडे
खासदार सुप्रियाताई. सुळे यांचा आज गावभेट दौरा पार पडला यावेळी पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. राज्य सरकार च्या बजेट बाबत विचारले असता त्या म्हणाल्या.

मी एक तर राज्याचे बजेट पूर्ण वाचलेले नाही, बातम्या दादांचे स्टेटमेंट पाहिले, एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी भूमिका मांडलेली आहे त्यातील बऱ्याच जुन्या स्कीम लागू करण्यात आलेल्या आहेत.
सरकारने ज्या कमिटमेंट्स केलेल्या आहेत तेवढे पैसे सरकारकडे आहेत का हेही पाहिले पाहिजे . राज्यासह दौंड मध्ये गुन्हेगारी वाढली आहे हे राज्य सरकार चे अपयश आहे .

दौंड मध्ये.अनेक रेल्वे गाड्या थांबत नाहीत मग रेल्वे नेमकी कोणासाठी आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी माजी आमदार रमेश आप्पा थोरात.पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विरधवल जगदाळे. राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार.सोहेल खान.ईत्यादी उपस्थित होते..
