Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » अनेक एक्झिट पोल सर्वे नुसार; नगर दक्षिणेत निलेश लंके विजयी गुलाल उधळणार..

अनेक एक्झिट पोल सर्वे नुसार; नगर दक्षिणेत निलेश लंके विजयी गुलाल उधळणार..

mahalokwaniBy mahalokwaniApril 17, 2024Updated:April 17, 2024No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


शिवसेना, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, आप सह आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जनसावंद यात्रेस सहभाग


अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा अन मोटारसायकल रॅलीला नगर शहरात बुधवारी (दि.१७) प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप सह आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यामध्ये उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने निलेश लंके यांनी नगर शहरात मोठे शक्ती[प्रदर्शन केल्याचे दिसून आले.

तसेच अनेक एक्झिट पोल सर्वेनुसार लोकांची निलेश लंके यांना पसंती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, काल अनेक टीव्ही चॅनेलनी एक्झिट पोल दाखविले त्यात निलेश लंके हे विजयी होणार असे पोल दाखविण्यात आले आहे, ग्रामीण भागात लंके यांना प्रचंड जनसमुदाय आहे. तसेच युवा वर्गाचा पाठिबा लंके यांना मिळताना दिसत आहे


आज शहरातील दिल्लीगेट येथून सकाळी भव्य प्रचारफेरी व मोटारसायकल रॅली काढण्यात आली. याप्रसंगी उमेदवार निलेश लंके, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, आम आदमी पार्टीचे भरत खाकाळ, युवा सेनेचे विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोकराव बाबर, संजय शेंडगे, नलिनी गायकवाड, आशा निंबाळकर, संजय झिंजे, गणेश कवडे, बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, सुरेश तिवारी, गिरीष जाधव आदिंसह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याप्रसंगी शहर प्रमुख संभाजी कदम म्हणाले, महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारफेरीस नगर शहरातील जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, यावर त्यांच्या लोकप्रियतेची प्रचिती येत आहे. नगर शहरातून त्यांच्या विजयासाठी शिवसेना प्रयत्नशील असून, जास्तीत जास्त मताधिक्य हे नगर शहरातून मिळवून दिले जाईल. नगरच्या विकासासाठी निलेश लंके हे खासदार होणे गरजेचे आहे. त्यामुळे नगरकरांनी त्यांना उत्स्फुर्त मतदान करावे, असे आवाहन केले.


यावेळी अभिषेक कळमकर म्हणाले, नगरमध्ये आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, सध्याच्या खासदाराने काहीही कामे केले नसल्याने आपणास काम करणारा खासदार दिल्लीला पाठवाचा आहे. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकिच्या काळात पारनेरमध्ये जी विकास कामे केली, त्याच पद्धतीने संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्येही विकास कामे करणारा खासदार झाला पाहिजे, यासाठी निलेश लंके हेच योग्य उमेदवार आहेत, असे सांगितले.


यावेळी किरण काळे म्हणाले, लोकप्रतिनिधी कसा असावा, हे निलेश लंके यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे खासदार म्हणून त्यांना लोकांनी स्विकारले आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांच्या पाठिमागे उभी असून, त्यांच्या प्रचार फेरीस मिळत असलेल्या प्रतिसादातून दिसून येत आहे. निलेश लंके यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष सरसावले आहेत. निलेश लंके यांच्या विजयात काँग्रेसचा मोठा वाटा असेल, असे सांगितले.

या प्रचार रॅलीचा शुभारंभ दिल्लीगेट येथून सुरु होऊन ही रॅली प्रभाग क्र.८ ते १३ मधील कल्याण रोड, आदर्शनगर, वारुळाचा मारुती, बालिकाश्रम रोड, तोफखाना, बागडपट्टी, सर्जेपुरा, तेलिखुंट, चितळे रोड, नेता सुभाष चौक, चौपाटी कारंजा, नालेगांव, गाडगिळ पटांगण, पटवर्धन चौक, लक्ष्मी कारंजा, नवीपेठ, कापड बाजार, गंजबाजार, दाळमंडई, मंगल गेट, झेंडीगेट, हातमपुरा, रामचंद्र खुंट, बुरुडगल्ली, माणिकचौक, पंचपीर यावडी, कौठीची तालिम मार्गे माळीवाडा येथील ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात सकाळाचा सत्राचा समारोप झाला. प्रचार फेरी दरम्यान नवीपेठ येथील पुरातन श्रीराम मंदिरात प्रभु श्रीरामाचे लंके यांनी दर्शन घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNilesh lanke| विखें कार्यकर्त्यांचा वापर कढीपत्त्या सारखा करतात; निलेश लंके यांचा विखेंवर हल्लाबोल
Next Article sujay vikhe | खा. डॉ. सुजय विखे ठरणार नगरजिल्ह्यासाठी विकास पुरुष
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.