Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Free Condoms: १८ ते २५ वयोगटातील सर्वांना मिळणार फ्री कंडोम! ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी केली घोषणा !

Free Condoms: १८ ते २५ वयोगटातील सर्वांना मिळणार फ्री कंडोम! ‘या’ देशाच्या राष्ट्रपतींनी केली घोषणा !

mahalokwaniBy mahalokwaniDecember 21, 2022No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देशातील सार्वजनिक आरोग्याविषयक प्रश्नावर तोडगा म्हणून मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व तरुण व्यक्तींना मोफत कंडोम उपलब्ध करुन दिले जातील असं मॅक्रॉन यांनी जाहीर केलं आहे. लहान वयामध्येच तरुणी गरोदर होण्याचं प्रमाण फ्रान्समध्ये फार जास्त आहे. त्यावरच तोडगा म्हणून मॅक्रॉन सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागील दोन प्रमुख कारणांपैकी एक कारण हे लैंगिक आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचंही आहे.

कुठे आणि कसे मिळणार हे फ्री कंडोम?

“ही गर्भनिरोधकांसंदर्भातील छोटीशी क्रांती आहे,” असं राष्ट्रध्यक्ष मॅक्रॉन यांनी ही घोषणा करताना म्हटलं. १८ ते २५ वयोगटातील व्यक्तींना मोफत कंडोम पुरवले जातील असं मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. प्लाटीज शहरामध्ये आयोजित आरोग्यविषयक चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्या मॅक्रॉन यांनी चर्चासत्रादरम्यानच ही घोषणा केली. देशातील कोणत्याही औषध विक्रेत्याकडे वयाचा पुरावा सादर केल्यानंतर १८ ते २५ वयोगटातील व्यक्तींना मोफत कंडोम दिले जातील अशी ही योजना आहे.

आरोग्यविषयक विभागांनी फ्रान्समधील लैंगिक आजारासंदर्भातील धक्कादायक माहिती नुकतीच जाहीर केल्याचं वृत्त ‘रॉयट’र्स या वृत्तसंस्थेनं दिलं होतं. २०२० ते २०२१ दरम्यान लैंगिक आजारांचे प्रमाण म्हणजे एसटीडी प्रकारातील आजारांच्या रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचं फ्रान्समधील आरोग्यविषयक विभागांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जाहीर केलेला निर्णय हे प्रमाण कमी करण्यासाठी फायदाचा ठरु शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मोफत कंडोम देण्याचा हा निर्णय मॅक्रॉन सरकारने घेण्याआधीच २५ वर्षांखालील महिलांना गर्भनिरोधक साहित्याचं मोफत वाटप सरकारच्या माध्यमातून केलं जात होतं. तरुण महिलांना गर्भनिरोधक साहित्य परवडत नाही म्हणून त्यांनी त्याचा वापर केला नाही असं होऊ नये या उद्देशाने मॅक्रॉन सरकारने या साहित्य वाटपाचा निर्णय घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने गर्भनिरोधक गोळ्यांचा समावेश होता.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleमुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार, म्हणजे नेमकं काय होणार? लोकायुक्ताचे अधिकार कोणते?
Next Article पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून नामांतरासाठी अहमदनगर मनपा आयुक्त यांना निवेदन !
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.