दि. 30: रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालय येथे विद्यालयातील इयत्ता ५ वी ते १२ वी विद्यार्थ्यांना लोकप्रिय आमदार रोहित पवार यांच्या वतीने व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय कामासाठी उपयुक्त परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
जामखेड साठी रोहित पवार विकासपुरुष – हरिभाऊ बेलेकर
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर आबा राळेभात, पंचक्रोशी विद्यालयाचे स्कूल कमिटी अध्यक्ष बाबासाहेब उगले, सुरेश भोसले , वैजिनाथ पोले ,नगरसेवक अमित जाधव, प्राचार्य मडके बिके, कन्या विद्यालय मुख्याध्यापिका चौधरी के डी पर्यवेक्षक कोकाटे व्ही के, संजय हजारे, प्रकाश काळे, मोहन यादव नागेश कन्या विद्यालय शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Table of Contents
यावेळी नागेश विद्यालय स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर यांनी आमदार रोहित पवार नेहमीच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी मदत करत असतात जामखेडसाठी ते विकास पुरुष ठरले आहेत. विद्यार्थी हिताचा नेहमीच विचार करतात . कमी कालावधीत जास्त विकास कामे रोहित पवार यांनी कामे केली. असे मनोगत व्यक्त केले. वैजिनाथ पोले यांनी जनतेचे हित पाहणारा नेता व विकासाचा विचार करणारा नेता म्हणजे रोहित दादा पवार आहेत व त्यांनी सर्वसामान्यांसाठी काम केले आहेत व विद्यार्थी हित जपले आहे असे मनोगत व्यक्त केले.
Gautami Patil |गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल; गौतमीने केले असे काही कृत्य त्यामुळे झाला गुन्हा दाखल..
कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष मधुकर आबा राळेभात त्यांनी मनोगतमध्ये दादा नेहमीच्या ज्या ठिकाणी जातात तेथील विद्यार्थ्यांची लहान मुलांची चौकशी करून त्यांच्या काय अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात . राजकारण बालक, युवा पिढी, शिक्षक , शेतकरी काय बोलतात या गोष्टीवर राजकारण चालत असते . रोहित पवार नेहमीच मूलभूत सुविधाचा विकास करतात , नागेश कन्या विद्यालयासाठी टॉयलेट बाथरूम व स्वच्छ पाणी व्यवस्था लाखो रुपये दादांच्या माध्यमातून देऊन तयार करण्यात आले. दादांच्या वाढदिवसानिमित्त आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक पॅड वाटप करण्यात आले हे कौतुकाची बाब आहे. असे सांगितले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पॅड मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आमदार रोहित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के यांनी केले
