Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप

Gold Rate Today : वर्षा अखेरीस सोने-चांदीचा भाव वाढला;घेतली इतक्या रुपयांची झेप

mahalokwaniBy mahalokwaniDecember 28, 2023Updated:December 28, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link


Gold Rate Today : सोने-चांदीने गेल्या आठवड्यात दमदार कामगिरी बजावली होती. या आठवड्यात पण मौल्यवान धातूची चढाई सुरुच आहे. वर्षाअखेरीस सोने-चांदी पुन्हा विक्रमाला गवसणी घालण्याची शक्यता आहे. भाव वधारल्याने ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे

LIC मध्ये पदवीधर युवकांना नोकरीची सुवर्णसंधी , द्यावी लागतील फक्त 100 प्रश्नांची उत्तरे

सोने-चांदीच्या किंमती पुन्हा विक्रमी दिशेने धाव घेत आहे. गेल्या दहा दिवसांत एकदा किंमतीत घसरण नोंदविण्यात आलेली नाही. भाव एक तर स्थिर आहेत. अथवा भावात वाढ झालेली आहे. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातूंनी दमदार आघाडी उघडली होती. दोन आठवड्यांपूर्वी सोने-चांदीत सलग तीन दिवस घसरण झाली होती. गेल्या 15 दिवसांपासून किंमतीत घसरण नाही. भाव एकतर स्थिर आहेत. अथवा भावांनी चढाई केली आहे. किंमती आता यापूर्वीच्या विक्रमाला घवसणी घालण्याच्या तयारीत आहेत. सोने आणि चांदीने यावर्षातील उच्चांकी झेप घेतली आहे. सोने 65,000 रुपयांचा तर चांदीने 78,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. काय आहे सोने-चांदीचा भाव (Gold Price Today 28 December 2023)

Gold Rate 2300 रुपयांची झेप

Table of Contents

  • Gold Rate 2300 रुपयांची झेप

दोन आठवड्यांचा विचार करता सोन्याने 2300 रुपयांची झेप घेतली. गेल्या आठवड्यात 880 रुपयांनी तर त्यापूर्वी 1100 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती स्थिर होत्या. 26 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी तर 27 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,960 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Silver चांदीने घेतली भरारी

गेल्या दोन आठवड्याचा विचार करता चांदीत 5800 रुपयांची दरवाढ झाली. तर या आठवड्यात किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली आणि 300 रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात 25 डिसेंबर रोजी चांदीत 200 तर 26 डिसेंबर रोजी 300 रुपयांची दरवाढ झाली. तर 27 डिसेंबर रोजी 300 रुपयांची घसरण झाली. चांदीत या 15 दिवसांत एकूण 6300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,223 रुपये, 23 कॅरेट 62,970 रुपये, 22 कॅरेट gold rate सोने 57,912 रुपये झाले. 18 कॅरेट 47,417 रुपये, 14 कॅरेट सोने 36,986 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,064 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

Gold Rate सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleLIC मध्ये पदवीधर युवकांना नोकरीची सुवर्णसंधी , द्यावी लागतील फक्त 100 प्रश्नांची उत्तरे
Next Article New Car Price | फोरव्हिलर कार घेण्याचा विचार आहे घाई करा; २ दिवसानंतर महाग होणार, 9 कंपन्याची वाढवणार किंमत
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.