Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » शासकीय रकमेचा अपहार करणारा मुख्याध्यापक अशोक घोडेस्वार याला सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा – श्री आश्रूबा लटपटे

शासकीय रकमेचा अपहार करणारा मुख्याध्यापक अशोक घोडेस्वार याला सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करा – श्री आश्रूबा लटपटे

mahalokwaniBy mahalokwaniNovember 14, 2024Updated:November 14, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड – जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेवस्ती, राजुरी

येथील तत्कालीन मुख्याध्यापक श्री. अशोक शहाराम घोडेस्वार सध्या कार्यरत पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव आळवा, ता. जामखेड याने शाळा व्यवस्थापन समितीच्या व इतर खात्यातील लाखो रुपयांची रक्कम स्वतः नावे काढून बनावट पावत्या तयार करून फसवणूक करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. त्यामुळे त्याची चौकशी होऊन त्याला त्वरित सेवा निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी श्री अश्रुबा लटपटे यांनी गट शिक्षणाधिकारी, पं.स. जामखेड व मुख्यकार्यकारी अधिकारी, अहमदनगर यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली आहे तसेच १५ दिवसात कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,

श्री अशोक घोडेस्वार हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोल्हेवस्ती, राजुरी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खाते नंबर १६५/१०/००४५३० कॅनरा बँक, राजुरी ता. जामखेड या खात्यामधून विविध चेकद्वारे २२९३९१/- रुपये पेक्षा जास्त रक्कम स्वतःच्या नावावर काढून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. शाळा व्यवस्थापन समितीला अंधारात ठेवून मोठा भ्रष्टाचार केला आहे. बोगस बिले दाखवून अपहार केला आहे. शाळेला लागणाऱ्या वस्तू किंवा अन्य बाबी खरेदी करताना आर्थिक नियमानुसार तीन कोटेशन न घेता तसेच शाळा व्यवस्थापन समिती समोर विवरणपत्र सादर न करता घोडेस्वार यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे.

शालेय पोषण आहार योजनेच्या शाळेच्या बँक खाते नंबर 10/018/554705 या अहमदनगर जिल्हा अहमदनगर सहकारी बँक जामखेड शहर या खात्यामधून 13000/-रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वतःच्या नावावर काढून भ्रष्टाचार केला आहे शाळेतील मुलांना देण्यात येणारा पोषण आहार बनविण्यासाठी लागणारा भाजीपाला व इतर साहित्य खरेदी न करता केवळ भाजीपाला असा शब्द लिहून अनेक बोगस पावत्या तयार करून 20000/- रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वतःच्या नावावर काढून व बोगस बिले दाखवून अपहार केला आहे.

शाळा व्यवस्थापन समितीच्या मिटींगमध्ये सूचक अनुमोदक दिसून येत नाही मोघमपणे ठराव केल्याचे दिसून येते. विस्तृत प्रमाणात माहिती शाळा व्यवस्थापन समितीला न देता फसवणूक केली आहे.

एमपीएससी मुंबईच्या दिनांक १४/०२/२०१४ व दिनांक १४/०४/२०१४ च्या परिपत्रकानुसार गणवेश शिऊन घेणे आवश्यक आहे. परंतु अशोक घोडेस्वार यांनी रेडिमेड गणवेश खरेदी केलेले आहे. मुलांचे शिलाईसाठी माप घेतले नाही त्याचे फोटोही घेतले नाही. नियमानुसार गणवेश खरेदी करताना तीन कोटेशन घेऊन त्याचे विवरणपत्र शाळा व्यवस्थापन समिती समोर सादर करून त्याची मान्यता आवश्यक असते परंतु सर्व आर्थिक नियम धाब्यावर बसवून घोडेस्वार यांनी भ्रष्टाचार केला आहे. अशी तक्रार केली आहे

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleSujay Vikhe | सुजय विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या विषयी केले मोठे भाकीत..!
Next Article Rohit Pawar |कार्यकर्त्याची गाडी जाळून; राजकीय पोळी भाजण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न – पवनराजे राळेभात
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.