IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडच्या संघाने मजबूत झुंज दिली. मात्र, त्यांना सामना जिंकता आला नाही. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिका 2-0 ने खिशात (India Win IND vs IRE t20 series) घातली आहे.
भारताचे 186 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आयर्लंडने सलामीवीर अँड्र्यू बारबिर्नेच्या झुंजार 72 धावांच्या जोरावर 152 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
भारताने नाणेफेक हरले
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय IND संघाने 5 गडी गमावून 185 धावा केल्या होत्या. त्यामुळे आयर्लंडसमोर सामना जिंकण्यासाठी 186 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाडने 43 चेंडूत सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने आक्रमक खेळी करत 26 चेंडूत 40 धावा केल्या. तर अखेरीस रिंकू सिंगने हल्लाबोल केला. रिंकू सिंगने 38 आणि शिवम दुबेने नाबाद 22 धावा केल्या. दोघांनी धावफलकाला सिक्स खेचत फिनिशिंग टच दिला.

For his crucial and entertaining knock down the order, Rinku Singh receives the Player of the Match award 👏👏#TeamIndia complete a 33-run victory in Dublin 🙌
— BCCI (@BCCI) August 20, 2023
Scorecard ▶️ https://t.co/vLHHA69lGg#IREvIND | @rinkusingh235 pic.twitter.com/OhxKiC7c3h
पाहा दोन्ही संघ
आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (C), लॉर्कन टकर (WK), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅकार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट.
Sharad Pawar । ‘मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून ठोकून काढा’, शरद पवारांचे स्फोटक बोल..
Table of Contents
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, टिळक वर्मा, संजू सॅमसन (WK), रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसीध कृष्णा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह (C), रवी बिश्नोई.
