पाकिस्तानने दुबईत आतापर्यंत एकूण किती टी 20i सामने जिंकलेत?
पाकिस्तानने आतापर्यंत दुबईत एकूण 33 टी 20i सामने खेळले आहेत. पाकिस्तानने 33 पैकी 18 सामने जिंकले आहेत. तर 14 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर एक सामना टाय झाला आहे.
iPhone 17| आयफोन १७ हे फीचर्स आहेत खास ; जाणून घ्या किंमत

भारत-पाकिस्तान India vs Pakistan दुबईमध्ये किती वेळा आमनेसामने?
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ दुबईत 3 वेळा टी 20i सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. पाकिस्तान दुबईत टीम इंडियावर वरचढ राहिली आहे. पाकिस्तानने भारताला दुबईत 3 पैकी 2 सामन्यांत पराभूत केलं आहे. तर भारताला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. त्यामुळे रविवारी भारताकडे पाकिस्तानचा हिशोब बरोबर करण्याची संधी आहे.
India vs Pakistan | भारत-पाकिस्तानची आज काटे कि टक्कर

भारत-पाकिस्तानपैकी टी 20मध्ये वरचढ कोण? पाहा आकडे
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ टी 20i सामन्यांमध्ये 13 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने या 13 पैकी सर्वाधिक 10 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानला फक्त 3 सामनेच जिंकता आले आहेत. आता रविवारी कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तान संघ
सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफियान मुकीम, अबरार अहमद, हुसैन तलत, हसन अली, खुशदिल शाह, हरिस रौफ, मोहम्मद वसीम आणि सलमान वसीम.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ
अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंग.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांचं लक्ष, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान या संघात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

Table of Contents
आशिया कप 2025 स्पर्धेतील सर्वात मोठ्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 चिर प्रतिद्वंदी आमनेसामने आहेत. उभयसंघातील सामना रविवारी 14 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहलगाम दहशतावादी हल्ल्यानंतर दोन्ही संघांत पहिल्यांदाच टक्कर होणार आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत कोणताच संबंध ठेऊ नये, अशी तीव्र भावना देशवासियांची आहे. मात्र त्यानंतरही भारत सरकारच्या क्रीडा मंत्रायलाने या सामन्याला परवानगी दिलीय. त्यामुळे हा सामना होतोय. त्यामुळे देशवासियांचा या सामन्याला तीव्र विरोध आहे. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशभरात अनेक संघटना आणि विरोधकांकडून कडाडून विरोध केला जात आहे. भारत-पाकिस्तान सामन्याबाबत प्रत्येक लाईव्ह अपडेट आपण या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.