Indurikar सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका
कीर्तनकार इंदुरीकर Indurikar महाराज नेहमीच आपल्या कीर्तनाने चर्चेत असतात. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी होत असते, सर्वच वर्गातील नागरिक याला उस्फुर्त प्रतिसाद देत असतात अशातच त्याच्या एका वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कीर्तनकार इंदुरीकर Indurikar महाराज आपल्या कीर्तनाने नेहमीच चर्चेत असतात. अशातच एका वक्तव्यामुळे इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली पाहायला मिळत आहे . इंदुरीकर महाराज यांनी लिंगभेदावरून केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. इंदुरीकर महाराज यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे
नक्की वाचा नगरसेवक भाऊंनो वार्डात लक्ष द्या; नाहीतर जनता याच खड्यात पाडेल तुम्हाला.!
Table of Contents
एकीकडे इंदुरीकर Indurikar महाराज यांचे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे किर्तनाचे कार्यक्रम होत आहे, ते किर्तन करतांना सद्य परीस्थितवर बोलत असतात, अनेकांना त्यांचे कीर्तन आवडत असते, ते कीर्तनातून समाजप्रबोधन करत असतात, पण त्यांचे काही वक्त्यव्य हे वादग्रस्थ ठरत आहेत
पुढील सुनावणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात होणार
Indurikar इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून लिंगभेदावर भाष्य केले होते. त्या विधानावरून अंधश्रद्धा निर्मुलन समितीने औरंगाबाद न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद न्यायालयाने दिले होते. याविरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

परंतु,इंदुरीकरIndurikar महाराज यांनी जी याचिका दाखल केली होती ती फेटाळण्यात आली. यानंतर इंदुरीकरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयातही इंदुरीकर महाराज यांना दिलासा मिळाला नसून याचिका फेटाळण्यात आली आहे. यामुळे आता इंदुरीकर महाराज यांच्या विरुद्ध संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केस चालणार आहे.