जामखेड तालुक्यातील कुसडगाव ,सरदवाडी,भोगलवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पै.अंकुश (पप्पु) कात्रज कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते सरपंच शहाजी गाडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त होते.

जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
जामखेड तालुक्यातील कुसडगाव ,सरदवाडी,भोगलवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पै.अंकुश (पप्पु) कात्रज कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळते सरपंच शहाजी गाडे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे पद रिक्त होते.
सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अध्यासी अधिकारी रविंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक खास सभा घेण्यात आली. या वेळी सदस्य पै.अंकुश (पप्पु) कात्रजकर यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आली. यावेळी निवड होताच समर्थक यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना फेटे बांधण्यात आले.यावेळी माजी सरपंच शहाजी गाडे व ग्रामपंचायत सदस्य यांनी नवनिर्वाचित सरपंच पै. अंकुश उर्फ पप्पू कात्रजकर यांचा सत्कार केला.
Jio 5G Phone : जिओ चा 5G फोन लवकरच ग्राहकांच्या हातात; कधी होणार लॉन्च आणि किंमत.!
तसेच या बिनविरोध निवडीबद्दल कात्रजकर यांचे अभिनंदन केले.निवडणूक साठी तलाठी अविनाश देसुरकर, ग्रामसेवक सुरज एकशिंगे यांनी काम पाहिले. यावेळी बोलताना पै.कात्रजकर म्हणाले की,कुसडगाव, सरदवाडी, भोगलवाडी या ग्रुप ग्रामपंचायत गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन काम करणार.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य कार्ले दत्तात्रय गहिनीनाथ भोगल मंजुषा संतोष,वटाणे रूपसुंदर कल्याण,खरात मधुकर माधव,कात्रजकर वंदना नागेश,गंभिरे सोनल युवराज,जरांडे काशीबाई श्रीराम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रसन्न कात्रजकर, नागेश कात्रजकर, डॉ.आबासाहेब कात्रजकर, सोसायटी चेअरमन केशव कात्रजकर, भरत भोगल, शेषेराव कात्रजकर , बाळासाहेब कदम, नानासाहेब कात्रजकर,संचालक दिलीप गंभीरे, निळकंठ कात्रजकर, दिगंबर कात्रजकर

प्रदीप कात्रजकर,हनुमंत टिळेकर, उद्योजक हनुमंत कदम ,दादासाहेब कात्रजकर, रामभाऊ टिळेकर, बबन जगताप,संजय जगताप, कल्याण वटाणे, पिंटू वटाणे, संतोष वटाणे,बळीराम शिरसाट,लखुळ गाडे, धनंजय राऊत, तुकाराम कार्ले, सोमनाथ गाडे, कृष्णा गाडे, उध्दव शिरसाट,अविनाश शिरसाट, सचिन कात्रजकर, उमेश कात्रजकर,वंदन कात्रजकर , संतोष टिळेकर, विठ्ठल कात्रजकर, मुकुंद भोगल,शैलैश कुलकर्णी, महादेव भोगल, राजेंद्र कार्ले, विठ्ठल कदम, लक्ष्मण कात्रजकर, किसन जमदाडे,बाबासाहेब वाघ ,भरत काळे, रोहित कार्ले आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
