धनराज पवार
JAMKHED या कृषी महाविद्यालयात टँकरने पाणीपुरवठा

जामखेडJAMKHED तालुक्यातील हळगाव येथील कृषी महाविद्यालयाचा परिसर जवळ पास १०० एकर आहे. १०० एकर शेती कायमस्वरूपी प्रयोगासाठी उपयोगात आणण्यासाठी साधरण १० इंच आकाराची कायमस्वरूपी जलस्त्रोत असलेल्या ठिकाणावरून पाईप लाईन करणे आवश्यक आहे .
Table of Contents
वाचा जामखेडमध्ये गोळीबार; आरोपी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक, आरोपीच्या पायावर गोळीबार
आज रोजी चक्क पावसाळ्यात या कृषी महािद्यालयाला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे आणि या वर कृषी महाविद्यालयं चालणार असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. येथे पाणी उपलब्ध करण्यासाठी तात्पुरते पर्याय शोधले असतीलही मात्र त्या मधुन समस्या सुटण्याची शक्यता अजिबात नाही तरी यावर जे कायम स्वरुपी पर्याय आवश्यक आहेत ते करून या कृषी महािद्यालयाला भरपूर पाणीपुरवठा करण्याची योजना मंजूर करण्यात यावी ही विनंती. या साठी सिना नदी पात्रात मोठ्या आकाराची विहिर खोदणे , तालुक्यात सतेफळ तलावात विहीर खोदणे, उजनी येथून पाणी उपलब्ध करणे अथवा अन्य कोणता पर्याय योग्य आहे

या पैकी कोणताही पर्याय वापरात आणून हा प्रश्न कायम स्वरुपी सोडवणे आवश्यक आहे तरी यावर राजकारण न करता मा. रोहित पवार ( विधानसभा सदस्य कर्जत जामखेड) व मा. राम शिंदे ( विधान परिषद सदस्य) यांनी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे व चालू पावसाळी अधिवेशनात या प्रश्नाची सोडवणूक करून घ्यावी ही विनंती . जर दोन्ही आमदार महोदयांना यासाठी वेळ नसेल तर संभाजी ब्रिगेड हा प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न करणार आहे हे नक्की असे संभाजी बिग्रेड प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत व तालुका अध्यक्ष राजेंद्र काटकर यांनी सांगितले
