श्रीनगर येथे शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात ही कार्यशाळा
धनराज पवार
जामखेड jamkhed पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) येथे होणाऱ्या ‘सुशासनासह पंचायत’ या विषयावरील चार दिवसीय कार्यशाळेसाठी निवड झाली आहे. श्रीनगर येथे शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात ही कार्यशाळा दि. २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे.
[better-ads type=’banner’ banner=’6861′ ]
या कार्यशाळेसाठी ग्रामविकासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिलेले अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे नामांकन महाराष्ट्र शासनाने केले असून त्यांना या कार्यशाळेस उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. सध्या देशभर शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रात प्रयत्न सुरू आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व धोरणांचे अंतिम फलित शाश्वत विकास ध्येय साध्य करणे हेच आहे.
[better-ads type=’banner’ banner=’6874′ ]
त्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीना याबाबत प्रशिक्षण देणे, त्यांच्यामध्ये शाश्वत विकास ध्येयाबाबत जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न शासनाकडून नेहमीच सुरू असतात. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्रालयाकडून ‘सुशासनासह पंचायत’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेसाठी देशभरातून अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
