Jamkhed-Karjat | जामखेड-कर्जतचा खरा आरोग्यदूत कोण; राम शिंदे कि रोहित पवार .!
जामखेड-कर्जत Jamkhed-Karjat मध्ये विधानसभेचे वारे जोरात वाहताना दिसत आहे, एक मेकावर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरवात झाली आहे. मध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार राम शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. सध्या प्रचारात दोघांनी पण आघाडी घेतली आहे. सध्या तरी असे चित्र जामखेड कर्जत मध्ये दिसते कि, सकाळी महाविकासाआघाडी मध्ये प्रवेश आणि संध्याकाळी भाजपात प्रवेश असे चालले आहे. यामध्ये कार्यकर्ते भरकटले जातांना दिसत आहे.Ladki Bahin Hapta | लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरुनही पैसे आले नाहीत, महत्त्वाची अपडेट या दिवशी होणार जमा पैसे
Jamkhed-Karjat | जामखेड-कर्जतचा खरा आरोग्यदूत कोण
सध्या ॲम्बुलन्सची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. पण याचे सत्य पाहता आरोग्य क्षेत्रात आमदार रोहित पवार यांचे कार्य जामखेड -कर्जतJamkhed-Karjat मध्ये हे पहिल्या पासून चालू हे सर्वाना माहित आहे. त्यासाठी त्यांची ॲम्बुलन्स पण गावा गावात फिरत असते हे पण आमदार राम शिंदे यांची ॲम्बुलन्स हि अचानक फिरू लागली, आहे यावर मोदींचा फोटो तसेच आमदार राम शिंदे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. समाज सेवा किंवा आरोग्य सेवा हि फक्त निवडणुकी पुरती नसावी ती अविरत असावी
खरी समाज सेवा आणि आरोग्य सेवा कोण करत आहे, हे कर्जत जामखेडच्या जनतेला माहित आहे अशीच काही घटना सध्या घडली आहे आमदार रोहित पवार यांच्या औषध व गोळ्या वाटप करत असलेल्या ॲम्बुलन्स वर पक्षाचे नाव व चिन्ह नसतानाही भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला यानंतर ही गाडी जामखेड पोलीस स्टेशनला आणल्यावर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते पक्षाचे चिन्ह व नाव नसताना गाडी पोलीस स्टेशनला कसे आणली त्यामुळे जुन्या तहसील कार्यालयात लावलेल्या भाजप पक्षाचे नाव व चिन्ह असलेले ॲम्बुलन्स वर कारवाई करा असे म्हणतात पोलिसांनी ती देखील गाडी जामखेड पोलिस स्टेशनला आणली.
त्यामुळे कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज तालुक्यात चर्चा रंगली होती विरोधी आमदार राम शिंदे निवडणुकीच्या तोंडावर स्वतःचा आणि पंतप्रधानांचा फोटो असलेली शासकीय ॲम्बुलन्स केवळ मतासाठी मतदारसंघात फिरवत आहेत विशेष म्हणजे या कृत्यावर निवडणूक आयोग कोणतीही कारवाई करत नाही याबाबत सामान्य नागरिकांमध्ये त्रिव व संताप व्यक्त केला जात आहे . असाही आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी यांनी केला
Table of Contents
आत्त्ता सध्या दोन्ही ॲम्बुलन्स या जामखेड पोलीस यांनी जप्त केल्या आहेत, आणि त्या पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत