Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Jamkhed police| पुणे पोलिसांना जे जमले नाही ते जामखेड पोलीसांनी करून दाखविले

Jamkhed police| पुणे पोलिसांना जे जमले नाही ते जामखेड पोलीसांनी करून दाखविले

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 8, 2023Updated:February 8, 2023No Comments3 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

जामखेड प्रतिनिधि :- धनराज पवार

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंप्री चिंचवड ( पुणे) ला अनेक गुन्ह्यात हवा असणारा व गेल्या अनेक दिवसांपासुन पोलीसांना चकवा देत फरार असलेला जामखेड तालुक्यातील पाटोदा (गरड) येथील आरोपी सावळा शिवाजी खाडे यास मोठ्या शिताफीने अटक करण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. या दमदार कामगिरीमुळे जामखेड पोलीसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंप्री चिंचवड, पुणे येथील अनेक गुन्ह्यात पोलीसांना चकवा देत फरार असलेला आरोपी सावळा शिवाजी खाडे, रा. पाटोदा (ग), ता. जामखेड, जि. अहमदनगर हा जामखेड मध्ये येत असल्याची माहीती पोना / अजित कुटे, अंमली पदार्थ विरोधी पथक,पुणे यांना मिळाल्याने त्यांनी सदर बाबत त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतीष पवार (अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंप्री चिंचवड, पुणे) यांना कळविले त्यांनतर सदर माहीती श्री. संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक जामखेड यांना दिल्याने लागलीच पोनि. संभाजी गायकवाड यांनी पोसई, संपत कन्हेरे व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर आरोपी नामे सावळा शिवाजी खाडे याची माहीती देवून त्याबाबत अधिक माहीती मिळवून त्याला तात्काळ अटक करणेबाबत आदेशीत केल्याने सदरचे पथकाने सावळा शिवाजी खाडे, याचे बाबत माहीती ची जमवाजमव करण्यास सुरुवात केली.

ह

पो.नि.श्री. संभाजी गायकवाड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. आरोपी हा दि 06/02/2023 रोजी त्याची गावी येणार आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने पोनि. गायकवाड साहेब यांनी सदर माहीती अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड येथे कळवून त्यांना जामखेड पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले. यावेळी पोनि. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोसई, संपत कन्हेरे, पोकों/ अरुण पवार, पोका / संदिप राऊत, पोकों / संदिप आजबे, पोका / विजय कोळी, पोहेकॉ हनुमान आरसुळ व पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड, पुणे येथील सफा सुर्यवंशी, पोहेकॉ / बनसोडे, पोना./कुटे व पोना, धस यांनी आरोपी याचा त्याचे गावात शोध घेत असताना आरोपी हा त्याच्या घराचे छतावरील पत्र्यावर लपुन बसला असल्याचे समजले त्यांनतर लगेच तेथे सदर पथकातील अधिकारी / अंमलदार यांनी शिताफीने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपासकामी आरोपीस अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड येथील पथकाचे ताब्यात देण्यात आले. आहे. पुढील तपास सपोनि प्रशांत महाले नेमणुक- अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंप्री चिंचवड है करत आहेत.


सदरची कारवाई पोनि. संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोसई संपत कन्हेरे, पोकों/ अरुण पवार, पोकॉ. संदिप राऊत, पोकॉ./ संदिप आजबे, पोकॉ. विजय कोळी, पोहेकॉ हनुमान आरसुळ यांचे पथकाने केलेली असुन सदर पथकाचे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आण्णासाहेब जाधव, अपर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे व मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला यांचे कडुन अभिनंदन करण्यात आलेले आहे.


आरोपी नामे- सावळा शिवाजी खाडे, रा. पाटोदा, याचे एन.डी.पी.एस कलमानुसार खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.1) निगडी पो.स्टे. 295/ 2022. एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 20 (ब). II(क) 2) नारकोटीक्स विभाग पुणे, 366 / 2022, एन.डी.पी.एस. कलम 8 (क). 20 (ब) 11 (क) 3) नारकोटीक्स विभाग पुणे – 499 / 2022. एन.डी.पी.एस. कलम 8 (क), 20 (ब), 11 (क)

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleवीज चोरी करणारे ‘जोमात’; वेळोवेळी बिल भरणारे मात्र ‘कोमात’, MSEB चा भोंगळ कारभार – प्रफुल सोळंकी
Next Article Pcmc-kasba ! कसबा – चिंचवड पोटनिवडणूक होणार रद्द ?, उमेदवारांचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं कारण काय ?!
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.