आज महायुती सरकारचा शपथविधी झाला, शपथविधीनंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली, या बैठकीनंतर लाडक्या बहिणींना Ladki Bahin Yojana दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.
Cm Devendra Fadnavis | मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस या कामांना पहिली प्राथमिकता देणार.!

आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आज मंत्रालयात मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही मोठे निर्णय होणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
Ladki Bahin Yojana |लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज
राज्याच्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजेनेची Ladki Bahin Yojana घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून या योजनेचा लाभ महिलांना मिळत आहे. आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत.
Table of Contents
या बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना लाडकी बहीण योजनेबाबत Ladki Bahin Yojana सूचना केल्या आहेत. तातडीनं डिसेंबरचा हाफता हा लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला पाहिजे अशा सूचना आम्ही केल्या आहेत. आम्ही जे निर्णय घेतले ते फक्त कागदावरच राहिले नाहीत तर त्याची अंमलबजावणी देखील लगेचच केली. त्यामुळे आम्हाला पुन्हा जनतेचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

मी पूर्वी जेव्हा सीएम होता तेव्हा मी स्वत:ला मुख्यमंत्री नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजायचो, आता उपमुख्यमंत्री आहे तर मी आता स्वत: डीसीएम अर्थात डेडिकेटेड कॉमन मॅन समजतो असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.