भूतवडा-लेहनेवाडी येथील शेतकऱ्यांचे नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन; प्रश्न मार्गी न लावल्यास करणार उग्र आंदोलन..
जामखेड प्रतिनिधी- धनराज पवार
जामखेड नगरपरिषदेच्या स्थापनेपासून नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना पंचायत समिती मार्फत मिळणाऱ्या योजना व अनुदान बंद झाले आहे. तरी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पंचायत समिती द्वारे मिळणाऱ्या योजना व अनुदान परत नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना कसे लागू होईल यावर प्रशासनाने विचार करणे गरजेचे आहे. यामध्ये पंचायत समिती द्वारे मिळणाऱ्या योजना नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना मिळाव्या, शेतकऱ्यांसाठी नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये स्वतंत्र कृषी कक्ष व अधिकारी असावा.
Bajaj Finserv| बजाज फिनसर्व कार्डवर खरेदी करा मोबाईल एक रुपयाही न भरता; असे मिळवा बजाज फिनसर्व कार्ड
नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन
दरवर्षी ,शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असावी,नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांना पंचायत समिती द्वारे मिळणाऱ्या योजना मिळत नसतील तर नगर परिषदेतून शेतकऱ्यांना वगळण्यात यावे, किंवा नगर परिषदेमध्ये कृषी विभाग कसा आणता येईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.अशा मागणीचे निवेदन जामखेड शहरातील लेहनेवाडी येथील नवोदय बहुउद्देशीय संस्था व शेतकऱ्यांच्या यांच्या वतीने जामखेड नगर परिषद चे मुख्याधिकारी अजय साळवे यांना देण्यात आले.
यावेळी नवोदय संस्थेचे सचिव सागर जगताप म्हणाले की, कृषी विभाग आणि नगरपरिषद विभाग यांनी शेतकऱ्यांना ज्या शासकीय योजना आहेत त्याचा लाभ मिळाला पाहिजे तसेच पंचायत समिती मधील योजना नगर परिषदेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत नाही, त्यासाठी नगरपरिषद यांच्या मार्फत शेकऱ्यांसाठी स्वतंत्र विभाग काढण्यात यावा असे न झाल्यास पुढचे आंदोलन उग्र स्वरूपाचे असेल असे जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पंचायत समिती मार्फत जवळपास 2000 विहिरी मंजूर झाल्या आहेत. पंरतु नगरपरिषद हद्दीतील शेतकऱ्यांचा यात दोष काय? त्यांच्यासाठी विहिरी का नाहीत?
Table of Contents
यावेळी प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात नवोदय संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष गणेश जगताप, उपाध्यक्ष दिपक कदम, सचिव सागर जगताप , ॲडव्होकेट हर्षल डोके, नानासाहेब बाबर ( मेजर) माजी ग्रामपंचायत सदस्य संजय डोके,बाबासाहेब मगर ,अमोल राळेभात,प्रशांत जगताप ,आण्णासाहेब मगर,बाळु नेटके,अशोक राळेभात, केशव डोके, दत्ताञय विर, युवराज सुरवसे, भाऊसाहेब जगताप , आजबे,नागेश आजबे, सतिष जगताप ऋषी आंधळे आदी शेतकरी बांधवांच्या निवेदनावर सह्या आहेत.