Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Mansoon Update| Biporjoy बिपरजॉय चक्रीवादळाने चिंता वाढवली, मान्सून कधी बरसणार? हवामान विभागाने दिली नवी अपडेट

Mansoon Update| Biporjoy बिपरजॉय चक्रीवादळाने चिंता वाढवली, मान्सून कधी बरसणार? हवामान विभागाने दिली नवी अपडेट

mahalokwaniBy mahalokwaniJune 16, 2023Updated:June 16, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

राज्यातील अनेक धरणांमध्ये आणि तलावांमध्ये पाणीसाठा आता काही दिवसांचाच उरला आहे. अशातच मान्सूनचा Mansoon प्रवास संथगतीने होत असल्याने चिंता वाढली आहे. पण आता हवामान विभागाने दिलासा देणारी अपडेट दिली आहे.

मुंबईमध्ये अखेर पावसाच्या शिडकाव्याने दिलासा मिळालेल्या असला तरी शहरात अजूनही मान्सून Mansoon दाखल झालेला नाही. Biporjoy बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास संथगतीने होत असून, १८ ते २१ जूनदरम्यान त्याला पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. चक्रीवादळ अरबी समुद्रात अत्यंत हळूवारपणे पुढे सरकत असल्याने नैऋत्य मौसमी वाऱ्यांना चालना मिळत नसल्याचे दिसत आहे.

Mansoon मान्सून राज्यात ११ जूनला दाखल झाल्यानंतर त्याच्या प्रवासात अद्याप फार प्रगती झालेली नाही. रविवारपर्यंत फारसा पाऊस नसल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला होता. Biporjoy बिपरजॉय चक्रीवादळाने आर्द्रता खेचून घेतल्याने सध्या राज्यात फारसा पाऊस नाही. त्यामुळे मान्सूनच्या Mansoon पुढच्या प्रवासासाठी १८ जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Biporjoy बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या Mansoon प्रवासात निर्माण झालेले अडथळे दूर झाल्याचे भारतीय हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले होते. मात्र हा मान्सून कमकुवत असल्याचे दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गेले तीन दिवस तो खिळलेला असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले. एल निनोची स्थिती १५ जुलैनंतर विकसित होणार होती. मात्र ती आत्ताच निर्माण झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पुढील पावसावरही परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा घटक धन अवस्थेकडे झुकत असून, तो पावसासाठी सकारात्मक आहे, असे खुळे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी पावसाच्या या स्थितीवर अवलंबून शेतीची कामे करावीत यासाठी हवामान विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.

उत्तर कोकणात शुक्रवारपर्यंत हजेरी

सध्या मुंबईमध्ये पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व Mansoon पावसाचे संकेत आहेत. उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारपर्यंत सर्वदूर पाऊस हजेरी लावेल अशी शक्यता आहे. त्यानंतर शनिवार, रविवारी तो थोडा कमी होईल. दक्षिण कोकणात गुरुवारी अनेक ठिकाणी पावसाची उपस्थिती अपेक्षित आहे. मात्र त्यानंतर पुन्हा रविवारपर्यंत पाऊस कमी असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous Articleजामखेड शासाकीय निवासी शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा; पोलीस निरीक्षक महेश पाटील विशेष उपस्थिती.!
Next Article खर्डा येथे वडार समाजाच्या कार्यालयाचे निलेशभाऊ गायवळ यांच्या हस्ते उद्घाटन; वडार समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे- अँड. अरुण जाधव
mahalokwani
  • Website

ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.