जामखेड प्रतिनिधी: धनराज पवार
महावितरणच्या जामखेड येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून मा. शरद चेचर यांनी मंगळवारी (दि. ११ जुलै रोजी) कार्यभार स्वीकारला. याआधीचे उप कार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांची अहमदनगर चाचणी विभागामध्ये बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त जागी श्री. शरद चेचर आज रोजी रुजू झाले आहेत.

उप कार्यकारी अभियंता मा. शरद चेचर हे मूळचे संभाजीनगर येथील रहिवासी आहे. त्यांनी बी.ई. ( विद्युत अभियांत्रिकी पदवी शिक्षण घेतले असून यापूर्वी ते नेवासा उपविभाग येथे कार्यरत होते.
जामखेड तालुक्यामध्ये लोकाभिमुख प्रशासनातून उत्कृष्ट व तत्पर ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल तसेच महावितरणच्या महसूलवाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येईल असे उप कार्यकारी अभियंता श्री. शरद चेचर यांनी सांगितले. यावेळी कार्यभार पदी शरद चेचर हे रुजु झाले असून सहायक अभियंता हिरामण गावित यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.तसेच महावितरण येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा.मेंघाल (अरणगाव कक्ष) , श्रीम.चव्हाण मॅडम , मा.सुपेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.महालोकवाणी न्यूज चे जामखेड प्रतिनिधी पत्रकार धनराज पवार यांनी सत्कार करुन अभिनंदन केले.
