Nagar ओढे-नाले रस्ते गायब
नगर : नगर Nagar मध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे, तसेच नगर शहरात ताबा टोळी पण सक्रिय आहे, यानंतर आता नवीन टोळी या शहरात उदयास येताना दिसत आहे, नगर शहारातील मुख्यतः सावेडी उपनगरातील ओढे- नाले नास्तानाभूत होताना पाहायला मिळत आहे, पूर्वी या ओढ्याची लांबी रुंदी हि एखाद्या नदी प्रमाणे पाहायला मिळत होती, आता हे नालेच पाहायला मिळत नाहीत, जे शिल्लक आहेत त्यांची लांबी रुंदी मोजण्या जोगी राहिलेली नाही.

आता पावसाचे दिवस आहेत , नगर Nagar महानगर पालिकेने ओढे नाले साफ सफाई साठी लाखो रुपये खर्च केले आहेत, त्यांचे बिले हे काढले आहेत, मंग जर शहरात नाले ओढे हे गायब झालेले आहेत , आहेत त्यांची स्थिती नसल्यात जमा आहे, मंग हि साफसफाई किती नाल्याची झाली त्याची लांबी रुंदी किती, त्याला किती खर्च केला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव केली आहे .
नगर Nagar शहरात ताबा गॅंग नंतर आता ओढे नाले आणि रस्ते गायब करणारे टोळी सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे, जो रस्ता १८ मीटर होता तो आता ६ मीटर पण भरत नाही , पालिकेने वेळोवेळी संबधीताना सांगून सुद्धा या ठिकाणी कामकाज चालू केले आहे , या ठिकाणी पालिकेने मोजनि सुद्धा केलेली आहे, हि टोळी पालिका तसेच स्थानिक नगरसेवक यांना न जुमानता हा रस्ता गिळण्याच्या तयारीत आहेत, मंग नगर रचना विभागाचे कर्मचारी काय काम करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे, का या कर्मचाऱ्याचे तसेच अधिकाऱ्याचे हात या संपूर्ण प्रकरणात गुंतलेले आहेत याची पण चौकशी करण्यात यावी असे जाधव यांनी मागणी केली आहे
Table of Contents
ओढ्या नाल्याची लांबी रुंदी कमी झाल्यामुळे आणि या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे पावसाचे पाणी लोकांच्या घरात घुसते, रोग राई पसरते याला जबाबदार कोण? असा प्रश्न सामान्य जनता करताना पाहायला मिळत आहे, महानगरपालिका फक्त पाणी पट्टी, घर पट्टी गोळा करण्यापुरती शिल्लक राहिलेली पाहायला मिळत आहे , तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी दोषींवर कारवाई करण्यात यावी , जे रस्ता गिळण्याचे काम चालू तेथील बांधकाम बंद करण्यात यावे , ओढे नाले मोकळे करावेत ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्वरित काढावे असे न झाल्यास जाधव यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
