Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » ब्रेकींग न्यूज » Nagar-pune| नगर पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटमार करणारी टोळी जेरबंद
ब्रेकींग न्यूज

Nagar-pune| नगर पुणे महामार्गावर प्रवाशांना कारमध्ये बसवून लुटमार करणारी टोळी जेरबंद

mahalokwaniBy mahalokwaniFebruary 14, 2025No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आरोपीकडून 3,15,000/- रू किं.मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी सतीष मधुकर पठारे, रा.बँक कॉलनी, सुपा, ता.पारनेर हे दिनांक 11/02/2025 रोजी रात्री 20.30 वा.सुमारास अज्ञात आरोपीतांनी गाडी बंद असल्याचा बहाणा करून फिर्यादीस मदत करण्यास कारमध्ये बसविले.कारमध्ये बसल्यानंतर कार सुपा येथून घेऊन जाऊन फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून, त्याचे जबरीने मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर फिर्यादीचे कपडे काढुन घेतल्यानंतर त्यांना रस्त्यात सोडून दिले.याबाबत सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. 34/2025 बीएनएस कलम 309 (4) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.

मा.पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील उघडकीस न आलेल्या जबरी चोरीच्या गुन्हयांचा समांतर तपास करून, गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, अतुल लोटके, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, विशाल तनपुरे, प्रशांत राठोड व उमाकांत गावडे अशांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

दिनांक 13/02/2025 रोजी पथक तांत्रीक विश्लेषणाचे आधारे नमूद गुन्हयाचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा समीर गफ्फार शेख, रा.बोल्हेगाव, एमआयडीसी याने त्याचे साथीदारासह केला आहे. पथकाने मिळालेल्या माहितीवरून एमआयडीसी परिसरात संशयीत आरोपीचा शोध तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस नाव विचारले असता त्याने नाव 1) समीर गफ्फार शेख, वय 30, रा.बोल्हेगाव, एमआयडीसी, ता.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा हा 2) वैभव सुरेश कोठाळे, वय 32, रा.इरिगेशन कॉलनी, देवदैठण, ता.श्रीगोंदा 3) अक्षय दशरथ पडवळ, वय 29, रा.बोल्हेगाव, एमआयडीसी, ता.अहिल्यानगर 4) खंडू उर्फ संदीप मिठू काळे, रा.नागापूर, ता.अहिल्यानगर (फरार) याचेसह केला असल्याची माहिती सांगीतली.

ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मुद्देमाल व वाहनाबाबत विचारपूस करता समीर गफ्फार शेख याने गुन्हयात चोरी केलेली रक्कम आम्ही आपसात वाटुन घेतली व गुन्हयातील वाहन हे त्याचे मालकीचे काळे रंगाची हुंडाई कार क्रमांक एमएच-12-ईएक्स-6778 ही वापरल्याची माहिती सांगीतली.पथकाने आरोपी समीर गफ्फार शेख याचे ताब्यातुन 3,00,000/- रू किं.त्यात हुंडाई कार क्रमांक एमएच-12-ईएक्स-6778 व 15,000/- रू रोख रक्कम असा एकुण 3,15,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाने ताब्यातील 3 आरोपीतांना सुपा पोलीस स्टेशन गुरनं 34/2025 या गुन्हयाचे तपासकामी सुपा पोलीस स्टेशन येथे मुद्देमालासह हजर केले असून गुन्हयाचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,मा.श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर,मा.श्री.संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleMIDC पोलीस व अन्न औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई; तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article TAURAL INDIA| टॉरल इंडियाची सुप्यात ५०० कोटींची गुंतवणूक; १२०० जणांना रोजगार मिळणार- खा.नीलेश लंके
mahalokwani
  • Website

Related Posts

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

December 30, 2025

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

December 26, 2025

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

December 20, 2025

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

वार्ड क्र.५चा ठाम निर्णय बाहेरून येणाऱ्यांपेक्षा आमचा माणूसच हवाय ! – लक्ष्मी ताई पवार यांना नागरिकांचा वाढता विश्वास

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.