दरवेळेस प्रमाणे यंदाही नगरमध्ये सगेसोयऱ्यांचीच चर्चा आहे. कारण नगरमधलं राजकारण जरा वेगळं आहे. नगर Nagar मधील या राजकारणाने राजकीय गणितं देखील बदलतात. पण याचा फायदा यंदा कोणाला होणार आहे जाणून घेऊयात.

नगरचं Nagar राजकारण हे सगेसोऱ्यांचं राजकारण म्हणून ओळखलं जातं. या गणगोताची नगर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होते आहे. राज्यातली समीकरणं बदलली. त्याचप्रमाणे सगेसोयऱ्यांचीही गणितं बदलणार का. कोणताही काना-मात्र नसलेला नगर जिल्हा राजकीय गणगोतांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. सहकाराची पंढरी आणि सगेसोयऱ्यांमुळे पक्षीय भूमिकेऐवजी आपापसातील सहकार म्हणूनही नगरचं राजकारण चर्चेत राहतं. त्यामुळे यंदाही नगरमध्ये सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची चांगलीच चर्चा आहे. राजकारणात नगरच्या सगेसोयऱ्यांच्या नात्यांचं जाळं जास्तकरुन नगर शहर, राहुरी, नेवासा,शेवगाव, पाथर्डी, संगमनेर आणि कोपरगावात विस्तारलं आहे. नगरमधले नेते., राजकीय पक्ष आणि गणगोत नेमकं कसं आहे जाणून घेऊयात.
lanke Vs vikhe विखे कुटुंबाने आश्वासने देऊन जनतेला भुलविण्याचे काम केले – आ. नीलेश लंके यांचा आरोप
पहा कसे आहेत Nagar राजकीय नाते संबंध
संगमनेरचे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्या भगिणी पार्थर्डीचे भाजप नेते आप्पासाहेब राजळे यांना दिली आहे. राजळेंच्या सून मोनिका राजळे आधी राष्ट्रवादीत होत्या, आता भाजपच्या आमदार आहेत. आप्पासाहेब राजळेंची कन्या नेवासात ठाकरे गटाच्या शंकराराव गडाखांना दिली आहे.
शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांचे बंधू नरेंद्र गोले शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. घुलेंची एक कन्या नेवासातल्या ठाकरे गटाच्या गडाखांची सून आहे. आणि घुलेंच्या दुसऱ्या कन्या कोपरगावचे अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळेंच्या पत्नी आहेत.
Table of Contents
राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले भाजपात आहेत. त्यांची एक मुलगी नगरच्या संग्राम जगतापांना दिली आहे, जे सध्या अजित पवार गटात आहेत. दुसरी मुलगी नगरच्या कोतकर घराण्यात आहे जे याआधी काँग्रेसमध्ये होते. आणि तिसरी नमुलगी नगरच्या गाडे परिवारात आहेत जे शरद पवारांच्या गटात आहेत.
म्हणून नगरच्या राजकारणात काय होईल, याचा अंदाज बऱ्याचदा चुकतात. वर-वर नातेसंबंध आणि राजकीय पक्ष वेगवेगळे वाटत असले., तरी आतून सगळे एकच आहेत अशी चर्चा नगरमध्ये नेहमी रंगत राहते. सगेसोयऱ्यांच्या गणितात सुजय विखे यंदा आघाडीवर आहेत. राजकीय समीकरण बदलल्यामुळे सगेसोयरेही एकत्र आल्याचं म्हणत बळ वाढल्याचा दावा शिवाजी कर्डिलेंनी व्यक्त केलाय.
२०१९ चे मतदान
यंदा भाजपच्या सुजय विखेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके लढणार आहेत. नगर लोकसभेत शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 2019 ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले होते. विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतदान झालं. विखे 2,81,474 मतांच्या फरकानं जिंकले.
नगरNagar लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभांचं बलाबल पाहिल्यास श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते, शेवगावात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत. विखेंविरोधात गेली लोकसभा लढलेले अजित पवार गटाचे संग्राम जगताप नगर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात. तर कर्जतचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत.
