सोशल मीडियाची हवा नव्हे; जमिनीवरचं काम ठरणार नगरसेवकांच्या भवितव्याचं मोजमाप
अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीची चाहूल लागताच शहराच्या राजकारणात अचानक नवा उत्साह संचारलेला दिसतो. रस्त्यांवर, गल्लीबोळात, चौकाचौकात नवख्या चेहऱ्यांची गर्दी वाढलेली आहे. अनेक उमेदवार नगरसेवक Nagarsevak होण्याची महत्त्वाकांक्षा घेऊन मैदानात उतरले आहेत. पण प्रश्न असा निर्माण होतो की, ही महत्त्वाकांक्षा समाजासाठी सातत्याने काम करण्याच्या इच्छेतून आली आहे का, की फक्त निवडणुकीच्या तोंडावर राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा हा डाव आहे?
iPhone 17| आयफोन १७ हे फीचर्स आहेत खास ; जाणून घ्या किंमत

आजच्या मतदाराला केवळ मोठमोठ्या घोषणा किंवा सोशल मीडियावरील चमकदार पोस्ट्स याने फसवता येणं शक्य नाही. कारण मतदार अनुभवाने समृद्ध झाला आहे. त्याला माहीत आहे की निवडणूक संपल्यानंतर उमेदवार गायब होतात आणि पुन्हा पाच वर्षांनीच दिसतात. त्यामुळे नागरिक आता उमेदवाराची प्रतिमा बघताना एकच कसोटी लावतात – “याने समाजासाठी आतापर्यंत खरं काय केलं?”
Nagarsevak | अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत नवख्या चेहऱ्यांची लगबग

नवखे उमेदवार सोशल मीडियाचा वापर करून स्वतःभोवती कृत्रिम हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, फक्त डिजिटल हवेवर राजकारणाची इमारत उभी राहत नाही. फेसबुक-इंस्टाग्रामवरील व्हिडिओंनी, व्हॉट्सअॅपवरील पोस्ट्सनी मतदार प्रभावित होणार नाहीत. त्यांना हवेतले नव्हे, तर जमिनीवर केलेलं ठोस काम बघायचं आहे.

गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर, निवडणुकीच्या तोंडावरच अचानक दिसणारे आणि समाजकारणाचं मुखवटा धारण करणारे उमेदवार कधीच टिकलेले नाहीत. जनता त्यांना नाकारते आणि सातत्याने लोकांसाठी काम करणाऱ्यांनाच पुढे आणते. हा अनुभव इतका ठळक आहे की यंदाच्या निवडणुकीतही हा कल कायम राहील अशी चिन्हे आहेत.
Table of Contents
नगरसेवक Nagarsevak बनणं म्हणजे फक्त पदाची मजा नाही, तर जबाबदारी प्रचंड आहे. लोकांसाठी मूलभूत सुविधा उभारणं, परिसरातील समस्या सोडवणं, प्रत्येक नागरिकासाठी सहज उपलब्ध राहणं – हेच खरं नगरसेवकाचं काम आहे. पण जर उमेदवाराने फक्त निवडणुकीच्या काळात रस्त्यांवर फेरफटका मारला, फोटोसेशन केलं आणि काही गाजावाजा केला, तर जनतेच्या मनात तो दीर्घकाळ टिकणार नाही.
म्हणूनच, या निवडणुकीत खरी कसोटी नवख्या उमेदवारांचीच आहे. त्यांना सिद्ध करावं लागेल की त्यांची महत्त्वाकांक्षा ही केवळ राजकीय नाही, तर समाजासाठी काहीतरी देण्याची खरी इच्छा आहे. आणि जर ती सिद्ध झाली नाही, तर जनता त्यांना नक्कीच नाकारेल.

अखेर, लोकशाहीत मतदार सर्वात मोठा न्यायाधीश असतो. त्याच्या डोळ्यात धूळफेक करणं आता अशक्य आहे. लोक हुशार झाले आहेत, आणि ते आधी काम बघतात… मगच मत देतात.