Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nashik Onion | बळीराजा सुखावणार; सहा दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव उद्यापासून सुरु होणार?

Nashik Onion | बळीराजा सुखावणार; सहा दिवसांपासून बंद असलेला कांदा लिलाव उद्यापासून सुरु होणार?

mahalokwaniBy mahalokwaniSeptember 26, 2023Updated:September 26, 2023No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

Nashik Onion : नाशिक बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी मागील सहा दिवसांपासून कांदा खरेदी बंद केलेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत तोडगा काढणार असल्याचं म्हटलं आहे. मंगळवारी रात्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत मुंबईत एक महत्त्वाची बैठक संपन्न होत असल्याचं पवारांनी सांगितलं.

Rohit Pawar | रोहित पवार ‘भावी मुख्यमंत्री’; पुण्यानंतर आता जामखेड शहरामध्येही झळकले पवारांचे बॅनर..

नाफेडने खरेदी केलेला कांदा कमी दरामध्ये काही व्यापारी इतर राज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करतात, त्यामुळे कांद्याचे दर घसरले आहेत; असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. शिवाय बाजार समित्यांमध्ये लादलेले खरेदी शुल्क रद्द करुन बाजार फीस एक टक्क्यांवरुन अर्धा टक्का करावी, या व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत.

कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारला

दिनांक १९ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी निमित्त सुटी असल्याने बाजारसमितीतील कांदा व्यवहार बंद होते. ठराविक ठिकाणीच या दिवशी व्यवहार झालेत. मात्र त्यानंतर बुधवार दिनांक २० सप्टेंबरपासून कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने कांदा खरेदी बंद राहिली. परिणामी सणासुदीला कांदा विकून चार पैसे हातात येतील ही शेतकऱ्याची अपेक्षा फोल ठरली. दुसरीकडे नाफेडची कांदा खरेदीही अपेक्षित पद्धतीने होत नसून जास्तीचे निकष लावल्याने आणि कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी तिकडे पाठ फिरवली.

अजित पवार म्हणाले..

व्यापाऱ्यांनी २० सप्टेंबरपासून कांदा खरेदी बंद केलीय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत आज (मंगळवारी) रात्री सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राज्याचे कृषीमंत्री, पणनमंत्री, व्यापारी, पाच मार्केट कमिटीचे चेअरमन, संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कांदा खरेदीबाबत निर्णय

शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या विचार करुन कांदा खरेदीबाबत निर्णय घेतला जाईल. जीएसटीसंदर्भातही चर्चा होईल, असं अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यामुळे उद्यापासून नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरु होऊ शकते. बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं, यावर व्यापारी निर्णय घेऊ शकतात.

    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
    Previous ArticleCar Insurance | कार विमा कसा असावा खाजगी की व्यावसायिक; जाणून घ्या फायदे आणि तोटे..
    Next Article डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वसामान्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले – सौ.सुनंदाताई पवार
    mahalokwani
    • Website

    ashok kharat | नाशिक हादरलं! ‘भोंदू बाबा’ अशोक खरातचा घृणास्पद कांड उघड — प्रेग्नेंट महिलेलाही केला शिकार!

    Captain Kharat | असा अडकला कॅप्टन खरात गुप्त ऑपरेशनची थरारक कहाणी उघड ; पेनड्राईव्हमध्ये मोठ्या व्यक्तीचे धक्कादायक व्हिडीओ

    murder | विशाल भुतकर म्हणाला मी बायको सोबत असे केले; ऐकताच पोलीसही हादरले असं काय घडलं?

    Gas |युद्धामुळे गॅसची टंचाई? घरगुती गॅससाठी लोकांची मोठी गर्दी; अचानक मागणी वाढली

    JEE Advanced 2026 : परीक्षा 17 मे रोजी; अर्ज प्रक्रिया 23 एप्रिलपासून सुरू

    Jamkhed firing |जामखेडमध्ये निलेश गायवळ यांना मारहाण करणाऱ्यावर गोळीबार; सागर मोहळकर गंभीर जखमी

    VSR ला वाचवतंय? रोहित पवारांचा गंभीर आरोप – अजित पवारांच्या विमान अपघातावर नवे प्रश्न

    gold rate| युद्धामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी; तब्बल इतक्या हजारांनी वाढले सोनं

    Abhishek Kalamkar| अहिल्यानगर हादरलं! माजी महापौर अभिषेक कळमकर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.