Close Menu
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Facebook X (Twitter) Instagram
Mahalokwani News
  • Home
  • महाराष्ट्र
  • योजना
  • अहिल्यानगर
  • आंतरराष्ट्रीय
    • आर्थिक
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रिडा
  • ब्रेकींग न्यूज
  • राजकारण
    • लाईफस्टाईल
    • शिक्षण
  • संपादकीय
    • सामाजिक
Mahalokwani News
Home » Nilesh lanke | नीलेश लंकेंची तुतारी या तालुक्यात वाजणार; असा असणार लंकेंचा जनसंवाद दौरा

Nilesh lanke | नीलेश लंकेंची तुतारी या तालुक्यात वाजणार; असा असणार लंकेंचा जनसंवाद दौरा

mahalokwaniBy mahalokwaniMarch 31, 2024Updated:March 31, 2024No Comments2 Mins Read
Share WhatsApp Facebook Tumblr Twitter Pinterest Telegram LinkedIn Email Copy Link
Share
WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email Copy Link

आ. जयंत पाटील, खा. संजय राउत यांची उपस्थिती

महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. नीलेश लंके Nilesh lanke यांच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या शुभारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खा. संजय राउत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी अंकुश काकडे हे उपस्थित राहणार आहेत.

हे नक्की वाचा

BJP| भाजप विरोधात शिंदे गटात धुसफूस वाढली; भाजपचा सर्व्हेच्या नावाखाली जागांवर डल्ला?

सोमवारी सकाळी ९ वाजता पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी गडावर या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. शुभारंभानंतर मंगळवारपासून पाथर्डी तालुक्यातील विविध गावांमध्ये ही यात्रा जाणार आहे.

Nilesh lanke यांचा या दिवशी या तालुक्यात जनसंवाद

पाथर्डीनंतर इतर तालुक्यांमध्ये या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ एप्रिल रोजी नगर येथील विशाल गणपती मंदीरात या यात्रेचा समारोप होईल. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे अध्यक्ष आमदार आदीत्य ठाकरे माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शनिवारी नीलेश लंके यांची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्रीच संगमनेर येथे काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेउन दिड तास चर्चा केली.

लंके Nilesh lanke यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लंके हे मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील गावागावांतील नागरीकांशी संवाद साधणार आहेत. विविध गावांमधील नागरीकांचे काय प्रश्‍न, समस्या आहेत. वर्षानुवर्षांपासून प्रलंबित राहिलेले काय प्रश्‍न आहेत याची माहीती ते संकलीत करणार आहेत. माहीती संकलीत करून ते प्रश्‍न, समस्या दुर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगतानाच प्रलंबित प्रश्‍नही मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले.

Table of Contents

  • Nilesh lanke यांचा या दिवशी या तालुक्यात जनसंवाद

या दिवशी या तालुक्यात जनसंवाद

दि. १ ते ४ पाथर्डी, शेवगाव विधानसभा मतदार संघ, दि. ५ ते ८ पाथर्डी, राहुरी,नगर विधानसभा मतदार संघ, दि.९ ते ११ कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघ, १२ ते १४ श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ, दि. १५ ते १६ नगर शहर विधानसभा मतदार संघ.

Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email Copy Link
Previous ArticleNilesh lanke| आमदार निलेश लंके शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार.. ?
Next Article loksabha| नीलेश लंकेचा विजय निश्चित; जयंत पाटील यांना विश्‍वास
mahalokwani
  • Website

वीजबिलावर कायमचा उपाय! Solar वर सरकारची मोठी Subsidy, किंमत आणि Bank Loan ची संपूर्ण माहिती

Sharad pawar शपथविधीवर शरद पवार यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हणाले, तो त्यांचा..

राजकारणात मोठा ट्विस्ट! अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजपा–राष्ट्रवादी युतीची फायनल उमेदवार यादी जाहीर

Ahilyanagar | अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता; महायुती झाली तर..

mukundnagar |मुकुंदनगरमध्ये परिवर्तनाची लाट; डॉ. इम्रान शेख यांच्या चळवळीला उस्फूर्त पाठींबा

Bolhegoan| अहिल्यानगर हादरलं बोल्हेगावमध्ये ४० वर्षीय महिलेचा निर्घृण खून, दोन अल्पवयीन मुलींसह चार जणी अटकेत

शिवाजी डोके पाटील यांची मनाला भिडणारी भूमिका :मला तिकीट मिळालं तर माझ्यासाठी; नाही मिळालं तर मी तुमच्यासाठी

jamkhed | जामखेड हादरले नृत्यांगना महिलेची गळफास घेऊन लॉजमध्ये आत्महत्या; तिच्या सोबत कोण ..!

jamkhed nagarparishad |जामखेड नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांमध्ये रंगत वाढली

© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.