जामखेड तालुक्यातील शिऊर गावातील सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापण व एल ई डी दिवे या कामाची चौकशी अहवाल गट विकास अधिकारी जामखेड यांनी दि. १५/०९/२०२३ रोजी दिलेला पूर्ण चुकीचा असून तो आम्हाला मान्य नाहीत्या अहवाला बाबत आपण स्वत: चौकशी करुन संबंधितावर कार्यवाही करावी.या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर यांना शिवसेना दलित आघाडी चे जामखेड तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांनी रजिस्टर पोस्टाने पाठवले आहे.
शिऊर येथील पांडुरंग समुद्र
याबाबत माहिती अशी की ,जामखेड पंचायत समिती चे गट विकास अधिकारी यांनी कामाच्या चौकशीसाठी दोन अधिकारी नियुक्त केले होते व दहा दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले होते त्यांनी तो आदेश मानला नाही याचा अर्थ ते बीडीओ यांना जुमानत नाहीत.
एक अधिकारी १५ दिवसांनी आले व दुसरे २५ दिवसांनी आले व फक्त एक शोष खड्डा दाखवून फोटो काढले बाकी तुम्ही शोधा असे आम्हाला सांगून ३५ लोकांची यादी दिली सोबत येताना ज्या ठेकेदाराने काम केले त्याला सोबत आणले, गावातील सरपंच व ठेकेदार एकाच कुटुंबातील आहेत हे चौकशी अधिकारी व बीडीओ यांना माहित आहे. एल ई डी दिवे एका वस्ती वर जाऊन तीन -चार फोटो काढले व ग्रामपंचायत मध्ये येऊन बसले कुठल्याही कागद पत्राची शाहनिशा केली नाही.
Honda Activa ची लिमिटेड एडिशन खास फिचर्स लाँच; ब्लॅक आणि ब्लू स्कूटरची किंमत फक्त

आम्ही तसे विचारले असता ठेकेदार म्हणाला तुम्ही कुठेही जा माझे कोणीच काही करू शकत नाही. त्यामुळे या निवेदनाद्वारे आम्ही आपणाकडे न्याय मागत आहोत सन २०२०-२०२१-१५ वा वित्त आयोग आराखडा दि.०१/०८/२०२१ चा आदेश आराखड्यामध्ये नसतानाआदेश करून ठराव व तारखा हेड नसताना बोगस बील दाखवून फक्त पैसे काढून घेतले. सरपंच व ग्रामसेवक यांनी उपहार केला हि गोष्ट बीडीओ साहेब यांच्या लक्षात आली नाही घनकचऱ्या मधील ३३% रक्कम ग्रामपंचायतने कुठलाही ठराव न घेता खर्च केले कसे याचीही बीडीओ साहेबांनी चौकशी केली नाही
.
Table of Contents
दि.२०/०८/२०२१ रोजी जे बील काढले जे साहित्य खरेदी केले त्या बीलावर कुठल्याही तारखा नाहीत, ठरावावर तारीख नाही सुचक, अनुमोदक नाही गावतील सरपंच, ठेकेदार यांचे बीडीओ साहेबांशी चांगले हित संबंध आहेत तसेच पंचायत समिती मधील अधिकारी चांगले मित्र आहेत तरी या सर्व प्रकरणाची आपण स्वताहा चौकशी करावी व जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर दहा दिवसात कार्यवाही करावी अन्यथा आम्ही शिऊर ग्रामस्थ दि. १०/१०/२०२३ रोजी जि.परिषद अहमदनगर आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत उपोषणा दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल हि विनंती.

सदर कामाची चौकशी न झाल्यास शिऊर ग्रामस्थांसह १० ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद, अहमदनगर कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार आहोत. असा इशारा शिवसेना दलित आघाडी चे जामखेड तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र यांनी दिला.
