“मी दोन महिने आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी सुट्टी घेतली होती. मला काही लोक म्हणले सुट्टी घेऊ नका. तुम्ही संपून जाल, परंतु मी सर्वांना सांगू इच्छिते मी संपून जाणाऱ्यापैकी नाही” असे प्रतिपादन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी येथे केले
जामखेड । धनराज पवार
जामखेड येथे शिव – शक्ति परिक्रमा यात्रेचे जंगी स्वागत ; जेसीबीतून फुलाची उधळण

पंकजाताई यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज जामखेड येथे दुपारी पोहोचली. त्यावेळी शहरातील खर्डा चौकामध्ये त्यांच्यावर अकरा जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. व क्रेनच्या सहाय्याने त्यांना भव्य पुष्पहार अर्पण करून जामखेडकरांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आ. प्रा. राम शिंदे, नगर दक्षिणचे खा. सुजय विखे पाटील भाजपा नगर दक्षिणचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे उपस्थित होते.
Table of Contents
पंकजा मुंडे म्हणाल्या “माझ्यावर पक्षाने मध्यप्रदेश ची जबाबदारी दिली होती. मी दोन वर्ष तेथे काम केले परंतु मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात काम करावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मग मला माझी शक्ती वाढविली पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माझ्या जीवनातल्या आदर्श आहेत. त्या शिवभक्त होत्या माझ्याही हृदयात भक्तीचे बीज आहे. तुमची सर्वांची मुंडे साहेबांवर भक्ती आहे याची मला जाणीव आहे. परंतु तुमची शक्ती कोण आहे? असे म्हणतात समोरून समर्थकांनी आमची शक्ती “पंकजाताई” अशा घोषणा केल्या व तुम्ही महाराष्ट्रात पुन्हा सक्रिय व्हा अशा ही घोषणा केल्या.
[better-ads type=’banner’ banner=’7208′ ]
यावेळी पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या “मी माझ्या वैयक्तिक कामकाजासाठी दोन महिने सुट्टी घेतली होती. काही लोक मला म्हणले की तुम्ही सुट्टी घ्याल तर संपून जाल परंतु मी संपून जाणाऱ्या पैकी नाही. मी केवळ 50 लोक बरोबर घेऊन शिवशक्ती परिक्रमेला निघाले होते. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने मला एवढा प्रतिसाद दिला खऱ्या अर्थाने हीच माझी शक्ती आहे.
यावेळी बोलतांना आ. राम शिंदे म्हणाले कर्जत जामखेड तालुक्यातील लोकांची स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. व हे सर्व लोक तुमच्यामध्येच साहेबांना पाहतात म्हणूनच आज पाऊस असताना सुद्धा दोन्ही तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ताई तुमचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत मी दोन्ही तालुक्याच्या वतीने तुमचे स्वागत करतो
सत्कारानंतर पंकजाताई पुढे जामखेड तालुक्यातील खर्ड्याकडे रवाना झाल्या झाल्या तेथेही खर्डा पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. खर्डा येथे नागोबाच्या वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रवेशद्वाराचे पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नंतर पुढे दिघोळ येथे गीते बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले व पंकजाताई पुढे पाटोद्याकडे रवाना झाल्या.
यावेळी आ प्रा. राम शिंदे, डॉ. भगवानराव मुरूमकर,हज कमिटी चे सदस्य सलिम बागवान, गौतम उतेकर,प्रविण चोरडिया,पोपट राळेभात, मनोज कुलकर्णी, पांडुरंग उबाळे, सोमनाथ पाचर्णे, संजय राऊत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले,नगरसेवक अमित चिंतामणी, शहराध्यक्ष तथा नगरसेवक भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस अर्चना संपत राळेभात, बिभिषण धनवडे, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन गडदे, सोमनाथ राळेभात, ॲड. बंकटराव बारवकर, प्रविण सानप, सरपंच अंकुश शिंदे,
सचिन घुमरे,गोरख घनवट, संपत राळेभात, डॉ.अल्ताब शेख, जमीर बारूद,सुनील यादव, उध्दव हुलगुंडे,अर्जुन म्हेत्रे,युवा नेते मोहन देवकाते, संतोष गव्हाळे, प्रविण बोलभट, शिवकुमार डोंगरे, अशोक महारनवर, नागराज मुरुमकर, ऋषिकेश मोरे , तुषार बोथरा, खर्डा येथे बाजीराव गोपाळघरे रवी सुरवसे नानासाहेब गोपाळघरे संजय गोपाळ बाळासाहेब गोपाळघरे केशव वनवे हरिदास गोपाळ घरे अनिल दराडे नामदेव गोपाळघरे बाळासाहेब गीते माऊली जायभाय व पंकजा मुंडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
