Police Bharti 2024 भरतीची तयारी करणारा तरुणाने संसदेत घुसखोरी करुन गोंधळ घालणारा अमोल शिंदे हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील झरी गावचा रहिवासी आहे. संबंधित घटनेनंतर लातूर पोलीस अधिकच्या तपासासाठी झरी गावात दाखल झाले. त्यांनी अमोल शिंदे याच्या घरी जावून त्याच्या आई-वडिलांची चौकशी केली. यावेळी अमोल विषयी महत्त्वाची माहिती समोर आलीय.

Police Bharti 2024 भरतीची तयारी करणारा तरुण
देशाचं सर्वोच्च सभागृह मानलं जाणाऱ्या संसदेत आज महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने गोंधळ घातला. त्याच्यासोबत यावेळी एक हरियाणाची महिलादेखील होती. या दोघांना पोलिसांनी police अटक केली आहे. संबंधित घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. संसदेवर अशाप्रकारे कुणी घुसखोरी करुन गोंधळ कसा घालू शकतो? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संबंधित प्रकरणानंतर पोलीस प्रशासनाला खळबळून जाग आली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने तपासाला सुरुवात केली आहे.
Smart watch। स्मार्ट वॉच ब्लूटूथ कॉलिंगसह 999 रुपयांमध्ये, बॅटरी देखील चालेल 5 दिवस !
या प्रकरणी घोषणाबाजी करणारा आणि संसदेच्या सभागृहात पिवळा धूर करणाऱ्या तरुणाचं अमोल शिंदे असं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या वरिष्ठ पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना याप्रकरणी अधिकची माहिती मिळवण्याची सूचना करण्यात आली. त्यानंतर पोलीस अमोल शिंदे याच्या लातूर जिल्ह्यातील झरी गावात दाखल झाले.
अमोल शिंदे हा लातूरच्या चाकूर तालुक्यातील झरी गावचा रहिवासी आहे. संबंधित घटनेनंतर चाकूर पोलीस तातडीने झरी गावात दाखल झाले. ते झरी गावात विचारपूस करत अमोल शिंदे याच्या घरी पोहोचले. यावेळी पोलिसांनी अमोल शिंदे याच्या आई-वडिलांना त्याच्याविषयी माहिती विचारली. अमोल धनराज शिंदे असं त्याचं पूर्ण नाव आहे. अमोलची घरची परिस्थिती खूप बेताची आहे. त्याचे आई-वडील मजूर आहेत. ते मजुरी करुन उदरनिर्वाह भागवतात. दुसरीकडे अमोल हाPolice Bharti 2024 शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांना चौकशीतून समोर आली आहे.

Table of Contents
गावकऱ्यांना माहिती नाही
अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून काय करत होता? याची चौकशी पोलिसांनी यावेळी केली. पोलिसांनी त्याच्या झरी गावातील नागरिकांची चौकशी केली. अमोलच्या नातेवाईकांशी चर्चा केली. गावातील नागरिकांशी चर्चा केली. गावातील कुणालाही अमोल याच्याविषयी जास्त माहिती नाही. अमोलला गावात राहायला आवडत नसे, अशी देखील माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.