
कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार प्राध्यापक राम शिंदे हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी झगडणारे नेते आहेत. आमदार प्राध्यापक राम शिंदे हे पाच वर्षे आमदार व पाच वर्ष मंत्री होते. शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनातही त्यांचा मोठा सहभाग आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार प्रध्यापक राम शिंदे यांचा पराभव झाला होता. अडीच वर्ष विरोधात राहून आमदार प्राध्यापक राम शिंदे हे खचले नाहीत. उलट ते जनतेत व जनतेच्या प्रश्नासाठी महाविकास आघाडी सरकारला झगडत राहिले.
अडीच वर्षाच्या काळात सत्ता परिवर्तन झाले व महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार सत्तेवर आले. यावेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून सिंचन विहीर शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले व ते मंजूर करून आणले. खरे तर आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब हे प्रामाणिक हेतूने काम करत आहेत. परंतु दुसरीकडे रोहित पवार हे श्रेयवादासाठी आडकाठी टाकत आहेत.असे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर हे दैनिक सुर्योदय न्यूज शी बोलताना म्हणाले.

२६ जून २०२२ साली प्रा.राम शिंदे हे विधान परिषदेवर निवडून आले.तसेच ३० जून २०२२ साली सरकार सत्तेवर आले.यापूर्वी आमदार रोहित पवार यांच्या कार्यकाळात फक्त १०२ विहीर मंजूर झाले परंतु महायुतीची सत्ता आल्यानंतर आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून ४८१२ विहीर मंजूर झाले व सुरु आहेत.व काही विहीरीचे काम राहिले आहे.
Ram Shinde|आ.प्रा.राम शिंदे यांच्यामुळेच शेतकऱ्यांना विहीरीचा लाभ
MREGS ऑनलाईन अहवाल विहीर कामांची माहिती
आमदार रोहित पवार यांच्या कार्यकाळात मंजूर विहीर
२०१९ – २० मध्ये रोहित पवार यांनी ६ मंजूर विहीर, ६ सुरू विहीर, ४ पूर्ण विहीर,२०२०-२१, ३१मंजूर विहीर,३१सुरू विहीर,२४पूर्ण विहीर
Table of Contents
आमदार प्रा राम शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर विहीर
२०२१-२२,७१मंजूर विहीर,७१सुरू विहीर,४९पूर्ण विहीर,२०२२-२३ ,११९ मंजूर विहीर,११९ सुरू विहीर, ५१ पूर्ण विहीर,२०२३-२४ ,४३८० मंजूर विहीर,३२४७ सुरू विहीर,१०४ पूर्ण विहीर,२०२४-२५,२१३ मंजूर विहीर,२०६ सुरू विहीर,एकूण,४८२०मंजूर विहीर= ३६८०सुरू विहीर,२३२ पूर्ण विहीर
या विहिरी मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे योगदान आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार,राज्य सरकार कर्मचारी व जामखेड पंचायत समिती टीम यांनी परिश्रम घेतले.आमदार प्रा राम शिंदे यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील शेतकऱ्यांना विहीरीचा लाभ झाला आहे विनाकारण रोहित पवारांनी श्रेय लाटू नये.
