Take a fresh look at your lifestyle.
mahalokwani

Jio Motive : Big Breaking । रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस, आता जुन्या कारमध्ये मिळणार लेटेस्ट…

0

Reliance Jio : मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) रिलायन्स जिओने jio Motive (Reliance Jio) पोर्टेबल ऑनबोर्ड डायग्नोस्टिक्स (OBD) डिव्हाइस ‘JioMotive’ लाँच केले आहे. या उपकरणाच्या मदतीने कोणतीही जुनी कार काही मिनिटांतच स्मार्ट कारमध्ये रुपांतरीत होईल. जिओ मोटिव्ह डिव्हाईसमध्ये अँटी-थेफ्ट अलर्ट, अँटी-टॉ अलर्ट, जिओ फेन्सिंग, रिअल टाइम लोकेशन डिटेक्शन आदी फीचर्स आहेत.

Jio Motive रिलायन्सने लाँच केलं नवीन डिव्हाईस

bafana ad

RG nov

Deepfake । रश्मिका मंदानाचा ‘डीपफेक’ व्हिडीओ; काय आहे ‘डीपफेक तंत्रज्ञान’; जाणून घ्या..

Jio Motive ला कारच्या OBD पोर्टशी जोडणे आवश्यक आहे, जे बहुतेक वाहनांमध्ये स्टीयरिंग व्हीलच्या खाली स्थित आहे. कोणीही ते त्यांच्या कारला जोडून वापरू शकतो. Android वापरकर्ते Google Play Store वरून GeoThings अॅप डाउनलोड करतात आणि Apple वापरकर्ते Apple App Store वरून GeoThings अॅप डाउनलोड करतात. तुमचा Jio नंबर वापरून JioThings अॅपवर लॉग इन किंवा साइन अप करा.

आता Jio Motiv निवडा आणि अॅपमध्ये डिव्हाइसचा IMEI नंबर प्रविष्ट करा आणि पुढे जा वर टॅप करा. अॅपमध्ये तुमच्या कारबद्दल आवश्यक असलेली माहिती एंटर करा आणि सेव्ह करा वर टॅप करा. Jio Motive ला OBD पोर्टशी कनेक्ट करा आणि नंतर कार सुरू करा. Jio Everywhere Connect नंबर शेअरिंग प्लॅनच्या अटी आणि शर्ती स्वीकारा. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सेवा सक्रियतेचा पुष्टीकरण संदेश मिळेल. डिव्हाइस सक्रिय करण्यासाठी तुमची कार 10 मिनिटे चालू द्या. सुमारे 1 तासानंतर, तुमच्या कारचा सर्व डेटा Geothings अॅपमध्ये दिसू लागेल.

JioMotive किंमत किती?

JioMotive ची किंमत 4999 रुपये आहे आणि रिलायन्स डिजिटल, Jio आणि Amazon सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. वापरकर्ते कोणत्याही री-वायरिंगशिवाय त्यांच्या कारमध्ये या स्मार्ट फीचर्सचा समावेश करू शकतात. JioMotive हे प्लग-अँड-प्ले डिव्हाइस आहे, त्यामुळे त्याला कोणत्याही वेगळ्या पद्धतीने इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही. iOS युजर्स अॅप स्टोअरवरून JioThings अॅप डाउनलोड करू शकतात आणि Android युजर्स Google च्या Play Store वरून JioThings अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकतात.

कारमध्ये हे उपकरण बसवून वापरकर्ते वाहनाची सुरक्षा वाढवू शकतील. JioMotive खरेदी केल्यावर एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते, तर एका वर्षानंतर 599 रुपयांचे वार्षिक सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

JioMotive या डिव्हाईसचे फीचर्स काय आहेत?

या डिव्हाईसचे अनेक फीचर्स आहेत. त्यातील काही महत्त्वांच्या फीचर्सवर एक नजर…

अँटी-थेफ्ट अलर्ट: कार चोरीला जात असल्यास युजर्सला अलर्ट मिळेल.

अँटी-टॉ अलर्ट: कार टो केली जात असल्यास त्याचा अलर्ट मिळले.

डिव्‍हाइस टँपर अलर्ट: हे डिव्‍हाइस काढून टाकल्‍यावर किंवा ते काढण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यावर युजर्सला त्‍यांच्‍या स्‍मार्टफोनवर तातडीने अलर्ट मिळू शकतो.

रिअल-टाइम व्हेईकल ट्रॅकिंग: या फीचर्समुळे तुमची कार ट्रॅक करता येई शकते.

कार वाय-फाय : या डिव्हाईसमुळे तुम्हाला कार वायफायची सुविधा मिळू शकते. ज्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असाल तिथे तुम्हाला हायस्पीड वायफाय मिळेल.

जिओ फेन्सिंग: या फीचर्समुळे युजर्सला आपली कार एका विशिष्ट अंतरापर्यंत गेल्यास तुम्हाला अलर्ट मिळतो. जिओफेन्सिंगमध्ये व्हर्च्युअल झोन सेट करणे समाविष्ट आहे. तुमची कार एखाद्या विशिष्ट क्षेत्रात प्रवेश करते किंवा बाहेर पडते तेव्हा तुम्हाला अलर्ट मिळतो. तुम्हाला या विशिष्ट मर्यादेत कारची अॅक्टिव्ही पाहता येऊ शकते.

अॅक्सिडेंट डिटेक्शन : कारचा अपघात झाल्यास युजर्सला त्यांच्या स्मार्टफोनवर रिअल-टाइम अलर्ट मिळू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळालेली खाती पुढिलप्रमाणे कॅप्टन कूल बद्दल तुम्हाला या गोष्टी माहितीय का ? बोल्ड फोटोशूटने प्रेग्नेंसीच्या अफवांना पूर्णविराम