आमदार प्रा राम शिंदे साहेब यांना भूमीपुत्र म्हणून कर्जत जामखेड मतदारसंघातून जनसामान्यांचा मिळत असलेला वाढता पाठिंबा पाहुन विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.आपण विकासाच्या मुद्यावर कोठेतरी मागे पडत असल्याचे लक्षात आल्यामुळे विरोधी उमेदवार रोहित पवार Rohit Pawar हे समाजात समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे प्रयत्न करत आहेत.

Rohit Pawar |कार्यकर्त्याची गाडी जाळून; राजकीय पोळी भाजण्याचा रोहित पवारांचा केविलवाणा प्रयत्न
याचेच एक उदाहरण म्हणजेच रोहित पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेज वर जामखेड शहरातील फिरोज बागवान यांची स्कार्पिओ गाडी भाजपा कार्यकर्त्यांनी जाळली अशी पोस्ट केली आहे.वास्तविक पाहता,ज्याची गाडी जळाली आहे.त्यांनी जामखेड पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,माझी गाडी अज्ञात व्यक्तींनी जाळली आहे.त्यामुळे या फिर्यादीवरून असे स्पष्ट होत आहे
की,ती गाडी जळण्यामागे भाजप BJP च्या कोणत्याही कार्यकर्त्याचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष कसलाही संबंध नाही.फिरोज बागवान यांची स्कार्पिओ गाडी जाळण्यामागे रोहित पवार Rohit Pawar यांचाच हात असून हे त्यांनी केलेले राजकीय षडयंत्र आहे.या षडयंत्रातून त्यांना हिंदू – मुस्लिम समाजात जातीय तेढ निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत.अशी टीका भाजपा शहराध्यक्ष पवनराजे राळेभात यांनी केली.
Table of Contents
पुढे बोलताना राळेभात म्हणाले की,कर्जत जामखेड मधील स्वाभिमानी जनता असे राजकीय जुमल्यांना भिक न घालता , भूमिपुत्र आमदार प्रा राम शिंदे साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून येत्या २० नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक २ वरील ” कमळ या चिन्हा समोरील बटण दाबून मतदान रूपी आशिर्वाद देवून , भरघोस मतांनी विजयी करुन विधानसभेत पाठवणार आहे.
